शारदा मंदिर हायस्कूल कल्याण शाळेतील दक्ष पाटील यास वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी दिनेश दिलीप सूर्यराव

कल्याण शहरातील लाल चौकी येथील शारदा मंदिर संस्थेच्या शारदा मंदिर हायस्कूल कल्याण शाळेतील इयत्ता ८ वी ब या वर्गातील दक्ष प्रमोद पाटील या विद्यार्थ्याने नुकतच ठाणे येथे झालेल्या जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये १३ वर्षे वयोगटात उत्कृष्ट कामगिरी करून गोल्ड मेडल प्राप्त केले आहे. या कामगिरीमुळे त्याची राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या कामगिरीमुळे त्याचे शारदा मंदिर संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे. शारदा मंदिर हायस्कूल कल्याण शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली देशमुख, पर्यवेक्षिका सुरेखा पाटील, सर्व शिक्षक, कर्मचारी तसेच ग्रामस्थ वाडेघर यांनीही त्याचे अभिनंदन केले आहे. रुद्र लोखंडे चे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल