साहित्य हे समाज प्रबोधनाचे माध्यम – श्री सुरज गोळे

स्वराज्य वार्ता अकोला प्रतिनिधी बबनराव वि.आराख

कवितेच्या माध्यमातून समाजातील विविध विषय मांडता येतात, व समाज प्रबोधन होते असे प्रतिपादन प्रमुख अतिथी तथाअकोला आकाशवाणी चे प्रसारण अधिकारी श्री सुरज गोळे यांनी, अंकुर साहित्य संघ व उषाताई घुगे बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कौलखेड येथील गणेश गार्डन सभागृहात पार पडलेल्या स्व उषाताई घुगे स्मृतीप्रीत्यर्थ काव्य स्पर्धेचा निकाल व कवी संमेलन सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक श्री वासुदेवाराव खोपडे,अतिथी म्हणून माजी नगरसेवक गजानन गवई, नगरसेवीका योगीता पावसाळे,समिक्षक डॉ विनय दांदळे आदी विचारमंच्यावर उपस्थित होते. प्रास्ताविक श्री तुळशीरामजी बोबडे यांनी केले.दरम्यान
स्व उषाताई घुगे स्मृतीप्रीत्यर्थ घेण्यात आलेल्या काव्य स्पर्धेसाठी राज्यभरातुन आलेल्या सुमारे दिडशे वर कवितांचे परिक्षण प्रसिद्ध साहित्यिक समीक्षक डॉ विनय दांदळे यांनी केले, यामध्ये ब्रम्हपुरी ( चंद्रपूर) येथील रोशन पीलवान प्रथम पुरस्काराचे मानकरी ठरले तर व्दितीय नाशिक येथील सौ अलका कोठवदे आणि तृतीय क्रमांक सौ सारिका अयाचित यांना मिळाला,
तर उत्तेजनार्थ पूरस्कार राहुल भगत,‌सौ प्रिया भोंडे, प्रकाश डोबाळे, श्री कृष्णराव घाडगे, सुमेध वानखडे यांच्यासह अनेक मान्यवर साहित्यिक विजेत्या कवींना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्राने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध कवी गजानन छबीले यांनी केले तर आभार कवी सुनिल लव्हाळे यांनी मानले.
कवी संमेलन अध्यक्ष स्थानी डॉ अशोक सिरसाठ तर प्रमुख पाहुणे प्रा विठोबा गवई, कवी पत्रकार देवानंद गहीले उमा गंवई,विचार मंच्यावर होते श्री सुरज गोळे , श्री हिम्मत ढाळे सौ सारिका अयाचित, राहूल भगत,प्रा संजय कावरे ,नारायण अंधारे नयनाताई देशमुख प्रा मोहन काळे, गोदावरी कलोरे, तारा अस्वारे, डॉ विनय दांदळे सुनील लव्हाळे,भारत ईंगोले अमोल गोंडचवर,सुमेध वानखेड़े
वासुदेवराव खोपडे तसेच मंच्यावरील मान्यवरांनी आपल्या कविता सादर केल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन धिरज चावरे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ मनोहर घुगे आणि कवी सुनील लव्हाळे यांनी व्यक्त केले.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल