स्वराज्य वार्ता प्रतिनिधी मारोती वडजे
आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हभप राम महाराज पांगरेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज नांदेड येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीत नांदेड जिल्हा अध्यक्षपदी ह.भ.प.पंढरीनाथ महाराज मिरकुटे,जिल्हा उपाध्यक्षपदी श्री जगन्नाथराव चक्रवार सावकार, जिल्हा सचिवपदी श्री बालाजीराव कौराजी पा.शिंदे माळकौठेकर व जिल्हा संघटक पदी श्री बाबुराव पा.जाधव चिंचोलीकर यांची निवड करण्यात आली. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प.राम महाराज पांगरेकर,संस्थेचे सहसचिव भागवताचार्य प्रभाकर महाराज पुय्यड, संस्थेचे सल्लागार शिवाजीराव पांगरेकर साहेब ( जिजा), संस्थेचे प्रसिद्धी प्रमुख श्री चंपतरावजी पा.डाकोरे, लोहा तालुका उपाध्यक्ष नागेश पा. कपाळे, कंधार तालुका कोषाध्यक्ष दिनाजी सांगळे, संस्थेचे संस्थापक कोषाध्यक्ष शिवाजी मदमवाड, मुदखेड तालुका सचिव बालाजी पा. पवार पार्डीकर उपस्थित होते. या सर्वांनी नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या
असे प्रसिध्दीपत्रक आम्हीं वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड यांच्या कडुन देण्यात आले आहे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






