एस टी महामंडळ मुरबाड बस आगारच्या बस पडतात वारंवार बंद मुरबाड तालुक्यातील एस टी ने प्रवास करणाऱ्या प्रवासांचे हाल

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी दिनेश दिलीप सूर्यराव

मुरबाड तालुक्यातील एसटीने प्रवास करणारे ग्रामीण भागातील विद्यार्थी, दूधवाले, भाजीवाले, तालुकास्तरावर एमआयडीसी कामगार, ज्येष्ठ नागरिक, महिला मोठ्या प्रमाणात एसटीने प्रवास करत असून त्यांचा प्रवास मात्र आता खडतर झाला आहे. एकेकाळी एसटीचा सुखकर वाटणारा प्रवास आता दुखकर वाटू लागला आहे कारण मुरबाड एसटी आगार च्या बसेस ह्या प्रवासा मध्येच बंद पडत असून प्रवाशांना नाहक हाल सोसावे लागत आहेत. सोमवारी मुरबाड -सरळगाव रस्त्यावर नढई गावाजवळ एसटी बंद पडली होती. मंगळवारी मुरबाड- म्हाडस- नारवली ही बस भुवन गावाजवळ बंद पडली होती. तसेच बुधवारी मुरबाड वरून बदलापूर कडे जाणारी तीन वाजताची बस ही मुरबाड बस स्थानकातून न सुटल्याने प्रवाशांचे हाल झाले होते. एसटीचा प्रवास हा बेभरवशाचे झाले असून रस्ता खराब असल्या कारणाने जुन्या बस ह्या ना दुरुस्त होऊन बंद पडत आहे.नवीन बस उपलब्ध असून त्या लांब पल्ल्यासाठी वापरात असून तसेच नवीन बस मुरबाड तालुक्यातील प्रवाश्यांना उपलब्ध करून न दिल्याने प्रवाशांचे मध्ये प्रचंड नाराजी आहे..

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल