विध्यार्थी प्रिय शिक्षक

स्वराज्य वार्ता / राम राठोड

आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी परिसरातील काऱ्हाळा येथे २०२४-२५ च्या शिक्षकांच्या प्रशासकीय बदलीमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काऱ्हाळा या शाळेचे सहशिक्षक श्री.कैलास आढे सर यांची बदली झाली आहे. त्यांना काऱ्हाळा या शाळेतून कार्यमुक्त करण्यात आले. सरांची बदली झाली आहे हे लेकरांना समजल्यावर त्यांच्या भावनांचा बांध फुटला…..सर नकाना आम्हाला सोडून जाऊ…..अशी आर्त हाक ती देत होती….. त्या लहानग्यांना काय माहीत प्रशासकीय बाबी ती ओक्सा-बोक्सी रडायला लागली. गेल्या 14 वर्षांपासून श्री.कैलास आढे सरांनी काऱ्हाळा शाळा नावारूपाला आणली. शाळेसाठी प्रचंड मेहनत या माणसाने घेतली.वस्ती शाळा शिक्षक म्हणून नेमणूक झाली होती…इतक्या दिवसांचा संघर्ष… आज सरांची बदली झाली. खूप मोठं दु:ख लेकरांसोबत शाळेच्या प्रत्येक घटकाला झालं आहे.

आज सरांना कार्यमुक्त केले उद्यापासून हा माणूस शाळेत दिसणार नाही ही भावना खूप दुःख देणारी आहे. प्रसिद्धीपासून कोसो दूर असणारं कैलास आढे सरांचं व्यक्तिमत्वं सहकार्याच्या भावनेने कायम ओतप्रोत भरलेलं असायचं. शाळेसाठी मेहनत करण्याची तयारी असणारे आढे सर कऱ्हाळा शाळेची फार मोठी ताकद राहिले. भविष्यातही सर शाळेसोबत असणारच आहेत पण शिक्षक म्हणून ते शाळेमध्ये नसणार आहेत ही गोष्ट खूप वेदनादायक आहे. लेकरांसाठी मातृत्ववत्सल व मातृहृदयी व्यक्तिमत्व आज शाळेतून जाताना शाळा ही नक्कीच ढसाढसा रडत असणार आहे.आढे सरांचा सहकारी म्हणून अनेक गोष्टी त्यांच्याकडून शिकता आल्या प्रत्येक गोष्ट करण्यासाठी या माणसाने मुक्त स्वातंत्र्य दिलं. आढे सरांच्या नेतृत्वाखालीच शाळा काऱ्हाळा नावारुपाला आली आहे. आदरणीय आढे सरांच्या सहवासामधील प्रत्येक क्षण खूप सुंदर व अविस्मरणीय होता. सरांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आढे सरांच्या कार्याला शतशः नमन सर आपण कायम स्मरणात व हृदयात रहाल….

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल