स्वराज्य वार्ता प्रतिनिधी दिनेश दिलीप सूर्यराव
टिटवाळा अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास या मार्गाचे मुख्य उद्दिष्ट आहे. या मार्गातून 20% अध्यात्म आणि 80% समाजकार्य चालते. या सेवा मार्गाचे 18 विभाग कार्यरत असून या विभागातून विद्यार्थी, युवक व सर्वसामान्य लोकांना सामाजिक, प्रापंचिक, अध्यात्मिक बाबींबवर मार्गदर्शन केले जाते. सेवा मार्गाच्या माध्यमातून टिटवाळा शहरातील पूर्व व पश्चिम भागामध्ये एकूण 3 सेवा केंद्रे चालू आहेत. या मार्गातून सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. त्यानुसार श्री स्वामी समर्थ सेवा, आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र दिंडोरी प्रणित ग्राम व नागरी विकास सक्षमीकरण अभियानातंर्गत परमपूज्य गुरूमाऊली यांच्या आदेशानुसार नैसर्गीक आपत्तीपासून अखिल मानावाचे संरक्षण होण्यासाठी व नुकसान टाळण्यासाठी बुधवार दि. 10 सप्टेंबर, 2025 रोजी टिटवाळा शहरामधील रेल्वे स्टेशनजवळील मारूती मंदिरात ‘मारुती स्त्रोत्र , हनुमान चालीसा व लांगुलास्त्र स्त्रोत्र पठण सेवा’ या विशेष सामूदायीक सेवेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित सेवेकऱ्यांनी मारुती स्त्रोत्र, हनुमान चालीसा व लांगुलास्त्र स्त्रोत्र यांचे सामूदयीक पठण केले. यावेळी मारूती मंदिर परिसरात सेवेकऱ्यांनी वृक्षरोपनही केले. यावेळी टिटवाळयामधील तीन्ही सेवा केंद्रातील सेवेकरी, तसेच वाशिंद व खर्डी केंद्रातील सेवेकरी मोठया संख्येने उपस्थित होते. या उपक्रमात ग्राम व नागरी विकास सक्षमीकरण अभियानाचे प्रतिनिधी सिद्धेश बंड दादा, विनोद चव्हाण दादा, श्री. ज्ञानेश्वर लांघी दादा व सौ. शुभांगी धाईगुडे ताई तसेच वासिंद केंद्रातून कडू चव्हाण दादा व खर्डी केंद्रातून राजेंद्र भोईर दादा उपस्थित होते. ग्राम व नागरी विकास सक्षमीकरण अभियानातंर्गत मारुती स्त्रोत्र , हनुमान चालीसा व लांगुलास्त्र स्त्रोत्र पठणाची झालेली सेवा परमपूज्य गुरुमाऊली व श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात आली.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल आवटे ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!







