स्वराज्य वार्ता प्रतिनिधी दिनेश दिलीप सूर्यराव
अंबरनाथ तालूका पूर्व भागातील वेल्फेअर सेंटर येथे रिक्षा चालक-मालक संघटनेचे राजकीय बोर्ड असून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या रिक्षा चालक मालक संघटना यांची गुन्हेगारी वाढली आहे. येथील अनेक तक्रारी शिवाजी नगर पोलीस स्टेशन मध्ये पेंडीग असून पक्षाच्या माध्यमातून संघटना चालत असल्या मुळे कायद्याचे अधिकारी कारवाई करण्यास तयार नाही आज दि.४/०९/२०२५ रोजी वेल्फेअर सेंटर रिक्षा स्टॅंड मध्ये आशिष देशपांडे रिक्षात बसले असताना गुन्हेगारी प्रवृत्तीचा गुंड हिरा गवळी यांनी दारू पिऊन थेट माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघचे अंबरनाथ तालूका अध्यक्ष आशिष देशपांडे यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करत अंगावर धाऊन आल्याची घटना घडली असून या बाबत देशपांडे यांनी अंबरनाथ पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली असून देशपांडे यांनी अनेक वेळा अनधिकृत रिक्षा चालक-मालक संघटना यांच्या विरुद्ध आवाज उठवला आहे यांचे समाजकार्य अनेकांना खूपणार असून अशा प्रकारे धमकावण्याचे प्रकार उघड उघड गेल्या अनेक वर्षा पासून सुरू असून आशिष देशपांडे यांनी आज तागायत समाजकार्या पासून कधीच माघार घेतली नाही आहे.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






