आज दिनांक 2 सप्टेंबर स्व. जिजाभाऊ गिराम यांचे पुण्यस्मरणा निमित्त शाळेत कार्यक्रम

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी

पाथरी तालुक्यातील लोणी बु. येथील प्रतिष्ठित नागरिक व मा.जि.प.सदस्य रणजीत गिराम यांचे वडील स्व. जिजाभाऊ धोंडीबा गिराम यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. वर्ष श्रद्धा नंतर पुण्यस्मरणाचा कार्यक्रम इतर खर्च टाळून शाळेतील वाचनालयाला पुस्तके भेट देऊन श्रद्धांजली अर्पण केली.जि.प.शाळा लोणी बु.येथील सुसज्ज अशा वाचनालयास एकुण पंधरा हजार रुपये किंमतीची 350 पुस्तके भेट दिली.या पुस्तकांचा शाळेतील मुलांच्या व वाचनाची आवड असलेल्या गावातील नागरिकांच्या ज्ञानात भरच पडणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती.श्री रवींद्र धर्मे.शिवसेना जिल्हा प्रमुख परभणी.श्री.महेश लांडगे साहेब.पोलीस निरीक्षक पाथरीश्री रणजीत गिराम.मा.जि.प.सदस्य परभणीश्री रामकिशन धर्मे प्रतिष्ठित नागरिक लोणी बु.श्री सुभाष चिंचाणे मुख्याध्यापक जि.प.शाळा लोणी बु.दत्ता जाधव.अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती.साहेबराव धर्मे मा.चेअरमन, यांची प्रमुख उपस्थिती होती.या कार्यक्रमास दत्तात्रय गिराम,रामराव सौंदडे, बालाजी मायकर,अशोक गिराम,डाँ.वैभव गिराम, रितेश धर्मे,इंजी.माणिक गिराम, धोंडीराम जाधव,सावता आप्पा गिराम,आन्साबाई शिराळे, शाळेतील शिक्षक श्री.शामसुंदर बगाटे,श्री.सय्यद सर,श्री शिंदे सर श्री गिराम सर यांची उपस्थिती होती.सुत्रसंचालन श्री सय्यद सर यांनी केले तर प्रस्ताविक मुख्याध्यापक श्री सुभाष चिंचाणे यांनी केले चिंचाणे सर यांनी शाळेतील भौतिक सुविधेसाठी ग्रामस्थाच्या योगदाना बद्दल व गुणवत्तेबद्दल आपल्या प्रस्ताविकात सांगितले.श्री रविंद्र धर्मे यांनी आपल्या भाषणात रणजीत गिराम यांनी पारंपरिक पद्धतीने पुण्यस्मरण न करता समाजापुढे एक वेगळाआदर्श ठेवल्याबद्दल अभिनंदन केले.श्री महेश लांडगे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, शाळा व व्यवस्थापन सि.सि. टिव्ही कँमेरे, प्रशस्त आँफीस,झाडे आणि प्रसन्न वातावरण खाजगी शाळेसही लाजवेल अशी आदर्श शाळा आहे.साहेब कवी असल्याने विद्यार्थ्यांना कविता ऐकविल्या.त्यानंतर साहेबांनी प्रत्येक वर्गात विद्यार्थ्यांसी संवाद साधला.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व विद्यार्थी, सहकार्य केले.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल