आष्टीत पोलिसांचे पथसंचलन

स्वराज्य वार्ता उपसंपादक उमेश वैद्य 

गणेश उत्सव आणि ईद-ए-मिलाद सर्वांनी शांततेत साजरे करावे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे

परतूर तालुक्यातील आष्टी येथे गणेश उत्सव आणि ईद-ए-मिलादच्या अनुषंगाने दि ३० शनिवारी रोजी आष्टी पोलिसांकडून पथसंचलन करण्यात आले.
यावेळी दोन्ही उत्सव सर्वांनी शांततेत साजरे करावे आणि गावात शांतता अबाधित ठेवावे असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आले. यावेळी आष्टी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस ठाण्यापासून मुख्य रस्त्यावरुन बसस्थानक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, मर्कस मज्जिदल् चौक, बाजार रोड, महावीर चौक, सिध्देश्वर मंदिर, नेब गल्ली, खंडेश्वर मंदिर, पाटील गल्ली, कुरेशी गल्ली, मदीना मस्जिद मार्गे हे पथसंचलक काढण्यात आले. त्यात पोलीस कर्मचारी, होमगार्ड मोठ्या संख्येने सहभागी झाले होते

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल