मुखेड तालुक्यात अतिवृष्टीचा तडाखा; उभ्या पिकांचे मोठे नुकसान

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी मारोती वडजे

मुखेड – सकाळपासून झालेल्या ढगफुटी सदर्श पावसामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेले पीक पूर्णता वाहून गेले. अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. मुखेड तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे गावांमध्ये पाणी शिरले असून रस्ते व जमीन खरडून गेली आहे. उंद्री प.दे. येथील बसस्थानक लगतच्या हॉटेल मध्ये पाणी शिरले .पर्जन्यमान नोंद (मागील २४ तासांत):अंबुलगा बु. ६६.०८ मिमीजाहूर ६६.१८ मिमी बारा हाळी ९६.०५ मिमी मुक्रमाबाद ७८.०८ मिमी जांब ५६.०८ मिमी चांडोळा ८१.०५ मिमी येवती ६७.०३ मिमी मुखेड ६६.०८ मिमी या मुसळधार पावसामुळे विशेषतः अंबुलगा बु. व जाहूर महसूल मंडळात अतिवृष्टीमुळे उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.शेतकरी व नागरिकांची मागणी आहे की, संबंधित महसूल व तहसील प्रशासनाने तातडीने पंचनामे करून शासनाकडे अहवाल सादर करावा व शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल