आष्टी : जालना जिल्ह्यातील परतुर तालुक्यात जि.प.प्रा.शाळा पिंपळी धामणगाव येथे दि. 25/08/2025 वार सोमवार या दिवशी शाळेतील चाळीस विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाच्या चाळीस प्रती वह्या पेन व प्रमाणपत्र हे वाटप एस एम ग्रुप कंपनी अकणी ऑड.मिलींद मोरे यांच्या कडून करण्यात आले त्यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम भविष्यात नवजिवन देणार आहे हे विसरता कामा नये हे सुचवले तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विभाग परतुरचे अभियंता किशोर दाभाडेसर शिक्षण गट विस्तार अधिकारी प्रकाश काका ढवळे क्रेंद्र प्रमुख जोगडेसर रत्नपारखेसर महिला बालकल्याण विभागाच्या सुपरवाईझर गोरे मॅडम वैद्यकीय अधिकारी डॉ प्रदीप राठोड हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रवक्ते म्हणून प्रा.सिद्धार्थ पानवाले हे लाभले होते त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास वेळेवर कसा करायाचा व आरोग्य कसं जपायचं मैदानी खेळ कधी खेळायाचे हे वेळापत्रक करून सांगितले आणि कुठल्याही शाळेत शिक्षण घेताना विज्ञान इंग्रजी गणित यावर विशेष जास्त भर दिला पाहिजे जेणेकरून भविष्यात जास्त स्कोप मिळेल हे सांगितले प्रल्हाद वाहुळे यांनी मंचावर बोलताना या शाळेला नवीन दोन खोल्या चा प्रस्ताव व इतर भौतिक सुविधा पुरविण्यात याव्यात हे दाखवून देऊन विशेष लक्ष वेधून अभियंता दाभाडे साहेबांना पर्याप्त उपाययोजना करण्याची मागणी केली.

प्रमुख उपस्थितीत मध्ये मुख्याध्यापक गोरेसर वाहेगाव डॉ.भदर्गे, शेषेराव झोटे, भरत मोरे ,तर विशेष उपस्थितीत एन पी डब्लु बि.खरात आरोग्य सेविका शिंदे मॅडम तर संतोष वाहुळे उपसरपंच प्रती पांडुरंग काळे शाळा समिती उपाध्यक्ष बाळासाहेब वाहुळे ग्रामरोजगार सेवक ऋषिकेश मोगरे असरफ बेग हरीभाऊ शिर्के संदीप वाहुळे होते या कार्यक्रमाचे आयोजक प्रल्हाद लताबाई कचरु वाहुळे होते तर सुत्रसंचलन विनोद खिल्लारे सर तर प्रास्ताविक सुरेश मोरे सर आणि आभार प्रदर्शन पौळ सर यांनी केले शाळेचे मुख्याध्यापक भोसले सर राऊतसर बि.थिटे सर अंगणवाडी कर्मचारी सुशीला रोढे व लांडे मॅडम सह उपस्थित होते.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






