स्वराज्य वार्ता प्रतिनिधी दिनेश दिलीप सूर्यराव
मुरबाड तालुक्यात तसेच संपूर्ण महाराष्ट्रात गणपती बाप्पाचे आगमन व पूजाअर्चा मोठ्या आनंदात भक्तगण साजरे करत असतात. परंतु वीजपुरवठा खंडित झाल्याने याचा आनंदात लोड शेडिंग मुळे विरजन येत असते. हिंदू सणांच्या कालावधी दरम्यान गेले अनेक वर्ष वीजपुरवठा खंडित होत असल्याची तक्रार मुरबाड तालुक्यातील नागरिकांची आहे. परंतु येत्या हिंदू सणांच्या कालावधीत कुठल्याही प्रकारचा विद्युत पुरवठा खंडित न होता अखंडित वीज पुरवठा चालू ठेवण्यासाठी मनसे मुरबाड तालुका उपाध्यक्ष कु. आकाश हिरू दळवी यांनी महावितरण कार्यालयास अर्ज दिले आहे. यंदाही महावितरण सणासुदीच्या काळात लोड शेडिंग करत असेल तर मुरबाड तालुका मनसे पदाधिकारी महावितरण कार्यालया समोर आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला आहे..
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






