राष्ट्रीय हिंदी आणि संस्कृत समूहगीत गायन स्पर्धेत शारदा मंदिर हायस्कूल कल्याण शाळेला तिसरे पारितोषिक

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी दिनेश दिलीप सूर्यराव

भारत विकास परिषद डॉक्टर आनंदीबाई जोशी शाखा कल्याण यांच्यातर्फे आयोजित केलेल्या राष्ट्रीय हिंदी आणि संस्कृत समूहगीत गायन स्पर्धेत कल्याण शहरातील शारदा मंदिर हायस्कूल कल्याण येथील शाळेला तिसरा क्रमांक मिळाला आहे. शारदा मंदिर हायस्कूल शाळेच्या वतीने सादर केल्या गेलेल्या दोन्ही गाण्यांना तिसरा क्रमांक मिळालेला आहे. या स्पर्धेत यश प्राप्त करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली देशमुख आणि पर्यवेक्षिका सुरेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाती पालांडे आणि भाग्यश्री ठाकूर या शिक्षिकांनी अथक परिश्रम घेतले होते. समुहगान स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळाल्याबद्दल शारदा मंदिर कल्याण शाळेचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल