स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी
दिनांक 21 ऑगस्ट रोजी गट साधन केंद्र, जिंतूर येथे अखिल भारतीय तालुकास्तरीय विज्ञान मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात इयत्ता आठवी ते दहावी च्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.क्वांटम युगाची सुरूवात संभाव्यता व आवाहने.” या विषयावर विद्यार्थ्यांनी आपले सादरीकरण केले. शैक्षणिक साहित्याचा वापर करून आपला विषय योग्य प्रकारे व निर्भीडपणे मांडला. नेमलेल्या परीक्षकांनी निश्चित केलेल्या निकषानुसार गुणदान केले.तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्यात प्रथम क्रमांक रिद्धी नामदेव भोंबे (सरस्वती माध्यमिक शाळा गडदगव्हाण), द्वितीय क्रमांक मनिषा गजानन चव्हाण (जवाहर विद्यालय, जिंतूर ), तृतीय क्रमांक ऋषिकेश सुदाम खरात (संत तुकाराम विद्यालय धानोरा), तसेच उत्तेजनार्थ गायत्री माधव कुकडे(श्रीमती शकुंतलाबाई बोर्डिकर विद्यालय जिंतूर) या विजयी स्पर्धक विद्यार्थ्यांना व सर्व सहभागी विद्यार्थ्यांना गटशिक्षणाधिकारी त्र्यंबक पोले यांनी आकर्षक प्रमाणपत्र देऊन त्यांचे कौतुक केले.विज्ञान मेळाव्याचे अध्यक्ष गटशिक्षणाधिकारी त्र्यंबक पोले तर प्रमुख उपस्थित म्हणून जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी रावसाहेब कातकडे, नारायण मुंढे, ज्ञानोबा साबळे हे होते. सूत्रसंचालन साहित्यिक मयूर जोशी यांनी तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन योगिता संगवई यांनी केले.परीक्षक म्हणून श्रीमती शकुंतलाबाई बोर्डीकर कनिष्ठ महाविद्यालयाचे मते व्ही.डी. व माकोडे बी.एस.तसेच जि.प.प्रा.शा.साखरतळा शाळेचे विज्ञान शिक्षक बटाले पी.एम. नि:पक्षपाती व अभ्यासपूर्ण काम केले. तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी श्रीमती योगिता संगवई, श्रीमती रत्नमाला तोडकर, वैजनाथ प्रधान, प्रभाकर नालंदे, हनुमान गायकवाड, नितीन पेठे , सुनील फड , राठोड , भास्कर मुंढे यांनी परिश्रम घेतले.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






