स्वराज्य वार्ता प्रतिनिधी मारोती वडजे
आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड या संस्थेच्या वतीने गेल्या आठ वर्षापासून संपूर्ण नांदेडसह महाराष्ट्रभर ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा आगळावेगळा उपक्रम हभप राम महाराज पांगरेकर व त्यांच्या आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून राबविला जात आहे.या पारायणाचे वैशिष्ट्य म्हणजे साधकांनी हे पारायण आपल्याच घरी बसून आपल्या सोयीच्या वेळेनुसार करावयाचे आहे. पारायणामध्ये लहान, थोर,वृद्ध,स्त्री,पुरुष,बालक सुद्धा सहभागी झालेले आहेत पारायण सर्वांनाच करता यावे त्यांना त्याच्या वेळेनुसार सहभागी होता यावे म्हणुन आम्ही वारकरी परिवाराने “घर तिथे ज्ञानेश्वरी! घरोघरी ज्ञानेश्वरी” हे ब्रीद उराशी बाळगून हा उपक्रम सुरू केला. पारायनासाठी लागणारी ज्ञानेश्वरी पारायण प्रत साधकांच्या घरोघरी मोफत स्वरूपात पोहोचविण्याचे काम आजपर्यंत आम्ही वारकरी परिवाराने केलेले आहे. सन २०१८ मध्ये अवघ्या ४२ साधकांना घेऊन सुरू केलेला प्रवास गतवर्षी ९०३३ एवढे साधक पारायणास बसवून संकल्पपूर्ती सोहळा म्हणजेच माऊलीच्या ज्ञानेश्वरी मध्ये “जेवढ्या ओव्या तेवढे साधक” पारायण करण्यास बसले होते. संकल्पपूर्ती सोहळा झाल्यानंतर सुद्धा आम्ही वारकरी परिवाराकडून याही वर्षी तो सोहळा सातत्याने साजरा करण्यात यावा म्हणून यावर्षी सुद्धा साधारणता: १००० ज्ञानेश्वरी पारायण प्रती, पारायण वेळापत्रकाचे पत्रक आम्ही वारकरी परिवाराकडून मोफत स्वरूपात वितरित केले आहेत. गेल्या ८ वर्षांमध्ये जवळजवळ ११००० साधकांना मोफत ज्ञानेश्वरी पोहोचवण्याचा स्तुत्य उपक्रम आम्ही वारकरी परिवाराकडून करण्यात आलेला आहे.यावर्षीचे पारायण दि: २५ जुलै शुक्रवार रोजी सुरूवात झाली आहे.त्या पारायनाची सांगता २९ ऑगस्ट २०२५ शुक्रवार रोजी वै. उद्धवराव पाटील यांचे मामा मंगल कार्यालय मारतळा ता. लोहा जि.नांदेड येथे सकाळी ८ ते १ या वेळेत हा सोहळा संपन्न होणार आहे. या.सोहळ्यात अनेक संत महात्मे यांचे आर्शिवाद रूपी प्रवचन , सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण,आरती,महाप्रदाने कार्यक्रमाची सांगता होनार आहे तरी साधक, भाविक भक्तांनी वेळेवर उपस्थित राहावे अशी माहिती आम्ही वारकरी परिवाराकडून देण्यात आलेली आहे.आम्ही वारकरी परिवाराच्या या उपक्रमाचे महाराष्ट्रभर कौतुक होत आहे. असे प्रसिध्दीपत्रक प्रसिद्धीप्रमुख चंपतराव डाकोरे पाटील कुंचेलीकर यांनी दिली
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






