मखेड तालुक्यातील उंद्री (प.दे.)येथे बैलपोळा सण हा अतिशय उत्साहात संपन्न

स्वराज्य वार्ता मुखेड तालुका प्रतिनिधी मारोती वडजे

दिनांक २२ऑगस्ट २०२५ शुक्रवार उंद्री (प.दे.) तालुका मुखेड जिल्हा नांदेड येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शेतकरी कष्टकरी गोरगरिबांचा सर्जा राजांचा सण संध्याकाळी ठीक चार च्या सुमारास बैल जोडी फिरवण्यात आले.अतिशय आनंदाच्या हर्ष उत्साहाच्या वातावरणामध्ये पोळा हा सण पार पडला विशेष म्हणजे या पोळ्याला जवळपास अंदाजित ३०० बैलांची उपस्थिती होती. खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी बैल सजून धजून आणले होते यांच्या व हनुमान मंदिराच्या भोवताली प्रदक्षिणा घालून शांततेच्या वातावरणात हा सण आनंदात पार पडला ह्या पोळ्याच्या निमित्ताने गावातील ज्येष्ठ माधवराव पाटील वडजे, सरपंच सुधाकर गुरुजी गन्लेवार, पोलीस पाटील विजयकुमार वादे, नारायण पाटील वडजे, आकाश पाटील वडजे, मानकरी श्रीराम पाटील वडजे,गोपाळ पाटील बिरादार, वारकरी संप्रदायाचे तालुकाध्यक्ष मारुती पाटील वडजे व मुखेड पोलीस स्टेशन येथून आलेले पोलीस अधिकारी नागरगोजे यांचे बंदोबस्तासाठी सहकार्य लागले,नवतरुण लहान मुले व समस्त नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल