मुखेड तालुक्यात मुसळधार पावसाचा तडाखा; जनजीवन विस्कळीत

स्वराज्य वार्ता मुखेड प्रतिनिधी मारोती पा.वडजे

३ महिलांचा मृत्यू, ५६ जनावरे वाहून गेली; हजारो हेक्टरवरील पिके जलमय

मुखेड तालुक्यात दि. १७ रोजी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाने तालुक्याचा चेहरा विद्रूप केला. लेंडी धरण परिसरासह रावणगाव, हसनाळ, भिंगोली, भासवाडी, पिंगोली, मारजवाडी, भेंडेगाव, सांगवी मादेव या गावांमध्ये अचानक पाण्याचा लोट घुसला. या आपत्तीत ३ महिलांचा मृत्यू झाला असून ५६ जनावरे वाहून गेली आहेत. ३७ घरांची पडझड झाली असून ५१ हजार २३० हेक्टर क्षेत्रातील पिकांना फटका बसला आहे.हसनाळ (पु.मु.) गावात गंगाबाई गंगाराम मादाळे (६०), निमाबाई हिरामण मादाळे (५५) आणि ललिता गोविंद शिंदे (५५) या तिघींचा मृत्यू झाला. सकाळपासून सुरू असलेल्या शोधमोहीमेत गावकऱ्यांनी मृतदेह बाहेर काढले. अजूनही काही नागरिक बेपत्ता असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.पूरामुळे शेतकऱ्यांचे हाताशी आलेले पिके, साठवलेले धान्य, जनावरांचे खाद्य व घरातील संसारोपयोगी साहित्य वाहून गेले. अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. नागरिकांना रात्रभर घराबाहेर काढून सुरक्षित स्थळी थांबावे लागले.रावणगावात २२५ नागरिक अडकलेरा वणगावात तब्बल २२५ नागरिक अडकले होते. हसनाळ येथे आठ जणांनी बुरुजावर, तर इतर काहींनी मशिदीवर आणि झाडांवर चढून जीव वाचवला. सकाळपासून महसूल, एसडीआरएफ, पोलीस व आर्मीचे जवान घटनास्थळी बचावकार्य करीत आहेत.आमदार राठोड यांचा आढावा पूरस्थितीवर आमदार डॉ. तुषार राठोड यांनी प्रशासनाशी संपर्क साधून मदतकार्य गतीमान करण्याच्या सूचना दिल्या. उपविभागीय अधिकारी अनुप पाटील, तहसीलदार राजेश जाधव व गटविकास अधिकारी रामोड हे रात्रीपासून घटनास्थळी दाखल राहून नागरिकांना मदतकार्य पुरवीत आहेत.सरकारकडून मदतीचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरस्थितीचा आढावा घेतला. “सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे आहे. पूर ओसरल्यानंतर पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत केली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.खासदार चव्हाण व माजी आमदार बेटमोगरेकर यांची भेट पूरग्रस्त भागाला खासदार रवींद्र चव्हाण व माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी भेट देऊन ग्रामस्थांच्या व्यथा जाणून घेतल्या. प्रशासनाला तातडीने मदतकार्य गतीमान करण्याचे निर्देश त्यांनी दिले.दरम्यान, एसडीआरएफच्या जवानांनी आतापर्यंत २५० हून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. प्रशासन, पोलीस, एसडीआरएफ आणि आर्मी यांच्या संयुक्त प्रयत्नामुळे मोठी जीवितहानी टळली आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल