प्रहार पक्षा तर्फे पाथरीत शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध – काळी राखी बांधुन आंदोलन

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी 

राखी दिनांक 09/ 08/2025 रोजी पाथरी – सविस्तर वृत्त असे की पाथरी येथील प्रहार पक्षाच्या वतीने शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध पाथरी तहसील कार्यालया समोर काळी राखी बांधून आंदोलन करण्यात आले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शेतकरी विरोधी धोरणांचा तिव् निषेध करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे आज पाथरी येथे तहसील कार्यालया समोर काळी राखी बांधून आंदोलन करण्यात आले हे आंदोलन प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते. बच्चू भाऊ कडू यांच्या आदेशानुसार पाथरी तालुका प्रमुख दिपक खुडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले या आंदोलनात मध्ये मोहम्मद अल्ताफ प्रहार दिव्यांग आघाडी तालुका प्रमुख, अमोल गिराम प्रहार जनशक्ती पक्ष बाभळगाव सर्कल प्रमुख, शेख मोहिनी, शंकर चव्हाण,असलम अन्सारी, गप्पार खान, सुलाबाई साळवे,आशामती जाधव, गंगा चव्हाण,मिराबाई शिंदे,वनारशी गजमल,मीरा साळवे, आशाबाई चव्हाण, अन्नपुर्णा गिरी, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते अशा प्रकारे आज पाथरी तहसील कार्यालया समोर काळी राखी बांधून आंदोलन करण्यात आले हे आंदोलन संपुर्ण महाराष्ट्राभर एकाच वेळी करण्यात आले

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल