स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी
हदगाव बु.येथे २१ व २२ जुलै रोजी अतिवृष्टीमुळे इंदिरा नगर भागात पाणी आल्याने झाले होते नुकसान
आ.राजेशदादा विटेकर, सभापती नखाते यांचा पुढाकार तर प्रशासनाची दक्षता
पाथरी तालुक्यातील हदगाव बु.येथे २१ व २२ जुलै रोजी झालेल्या जोरदार पावसानंतर लेंडी नदी आणि परिसरातील दोन्ही नाले ओसंडून वाहिले. यामुळे इंदिरानगर भागात तीन ते चार फूट पाणी गेले आणि नागरिकांचे अन्नधान्य, कपडे, संसारोपयोगी साहित्य यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. जनजीवन विस्कळीत झाले होते.याप्रकरणी बुधवार ६ आँगष्ट रोजी प्रशासनाने तातडीने प्रत्येकी १० हजार रुपये सानुग्रह अनुदान पुरग्रस्थांच्या बँक खात्यात वितरणाचे मदतकार्य हाती घेतल्याने नागरीकांना दिलासा मिळाला आहे.या पूरस्थितीत बाबत आ.राजेशदादा विटेकर ,बाजार समितीचे सभापती अनिलराव नखाते यांनी तातडीने प्रशासनाला नुकसान अहवाल देण्याचे निर्देश दिले होते.त्यानंतर उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण, तहसीलदार एस.एन. हंडेश्वर, पोलीस निरीक्षक महेश लांडगे यांनी यंत्रणेमार्फत वस्तुनिष्ठ पंचनाम्याचा सर्वेक्षण अहवाल जिल्हाधिकारी यांचे मार्फत शासनाला सादर केला.त्यानंतर आ.राजेशदादा विटेकर यांच्या पाठपुराव्याने नुकसानग्रस्त कुटुंबांकरिता शासनाच्या वतीने तातडीने प्रत्येकी १० हजार इतकी सानुग्रह मंजूर झाले.६ आँगष्ट रोजी हे १० हजार रूपये पुरग्रस्थांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे.त्यामुळे इंदिरा नगर भागातील नागरीकांना दिलासा मिळाला आहे. परंतु जोरदार पाऊस आल्यानंतर अशी परिस्थिती नेहमीच होते यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी पुरग्रस्थांकडून केली जात आहे.
हादगांव बु.येथे नुकसान स्थिती ची पाहणी करतांना आ.राजेशदादा विटेकर, सभापती अनिल नखाते, उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण ,तहसीलदार एस.एन.हांंडेश्वर यांनी पुरग्रस्थांना शासनाची नुकसानभरपाई देऊ असे आश्वासन दिले होते त्याची बुधवारी पुर्तता झाली

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






