रेणापूर जिल्हा परिषद शाळा 14 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणी माजी शिक्षण सभापती दादासाहेब टेंगसे यांच्या हस्ते उद्घाटन

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी

जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती मा. दादासाहेब काका टेंगसे यांच्या हस्ते जि.प. प्राथमिक शाळा रेणापूर येथे 14 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या संचाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमामुळे शाळेतील सुरक्षिततेला नवे परिमाण प्राप्त झाले आहे.

रेणापूर ग्रामस्थांच्या मदतीने शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात भौतिक सोयी सुविधा निर्माण करण्यात आल्या असून त्याच्या सुरक्षतेसाठी शाळेतील प्रत्येक वर्गखोली, किचन शेड आणि शालेय परिसरात एकूण 14 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून, या आधुनिक तंत्रज्ञानामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांचे वातावरण अधिक सुरक्षित व पारदर्शक झाले आहे.

उद्घाटन प्रसंगी मा. दादासाहेब टेंगसे यांच्या हस्ते शाळेतील सर्व 100% विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व स्पोर्टस ड्रेसचेही वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद व उत्साह स्पष्ट दिसून येत होता.

या कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. निहाजु डांगे, श्री. राजेभाऊ व्हनकळसे, शाळेचे मुख्याध्यापक आर.बी.किरवले, सर्व शिक्षकवृंद आणि ग्रामस्थ,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शाळेच्या प्रगतीसाठी घेतलेली ही कृती निश्चितच अनुकरणीय आहे व इतर शाळांसाठी प्रेरणादायक ठरणार आहे, असे प्रतिपादन माजी शिक्षण सभापती दादासाहेब टेंगसे यांनी व्यक्त केले.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल