स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी
साहित्यरत्न शिवशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लोकश्रेय मित्र फळा च्यावतीने शासकीय रुग्णालयात रुग्णांना फळाचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी फळा चे वाटप क्रांतिवीर लहुजी साळवे शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग रणखांब लाल सेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष कॉम्रेड गणपत भिसे लाल सेनेचे अशोक उबाळे निवृत्ती नितनवरे प्रदीप कांबळे विजय पाणबुळे सलीम इनामदार अब्दुल जब्बार सय्यद हबीब सय्यद इर्शाद या मान्यवरांच्या हस्ते रुग्णांना फळाची वाटप करण्यात आले
लोक श्रेय च्या वतीने वतीने अभिवादन करण्यात आले
यावेळी लोक श्रेय मित्र मंडळा चे संस्थापक अध्यक्ष सलीम इनामदार यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर व संघर्षावर तसेच साहित्य व संघर्ष करणारी व्यक्तिमत्व यांच्या विचाराचे देशाला व राज्याला गरज असल्याचे उदगार काढले यानंतर गणपत भिसे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त अल्पसंख्यांक समाजातील कार्यकर्ते व लोकश्रेय मित्र मंडळां च्या वतीने शासकीय रुग्णालयात सफरचंद व केळी वाटप करून हे घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे कौतुक करून मंडळाच्या कार्याचा गौरव केला यावेळी पांडुरंग रणखांब यांनी
ज्यांना भाऊ साठे ने छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा रशियामध्ये गायला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अण्णाभाऊ साठे यांचा मोलाचा योगदान आहे त्या अण्णाभाऊ साठेंचं अपूर्ण कार्य मराठा समाज पुढे नेण्यासाठी कटिबद्ध आहे असे प्रतिपादन केले यावेळी लोक श्रेय मित्र मंडळाचे अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






