सीसीटीव्ही तपास, कर्नाटकमधील पाठलाग आणि फिल्मी थरारानंतर पाथरी पोलिसांचे मोठे यश — ४८ तासांत चोरी गेलेली ब्रेझा कार जप्त

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी

पाथरी पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. 467/2025 कलम 379 (2) भादंवि अंतर्गत दाखल असलेल्या ब्रेझा कार चोरी प्रकरणात पाथरी पोलिसांनी फक्त ४८ तासांत मोठे यश मिळवले असून, फिल्मी थराराला साजेश्या शैलीत कार जप्त करण्यात आली आहे.
एमएच २५ AL ८९७७ क्रमांकाची ब्रेझा कार काही दिवसांपूर्वी चोरीस गेली होती. सदर प्रकरणी पाथरी पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. दोन दिवसांपासून सातत्याने सीसीटीव्ही फुटेज तपासून वाहनाचा माग काढण्यात आला.
दिनांक ०१ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी पोलिसांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर चोरी गेलेली कार ही कर्नाटकमधील तुमकुर जिल्ह्यात आहे. ही माहिती मिळताच पाथरी पोलिसांनी त्वरेने तुमकुर व बेंगळुरू पोलिसांशी संपर्क साधून आवश्यक माहिती देवून मदत मागितली.
निलमंगला टोलनाक्यावर बेंगळुरू पोलिसांनी वाहन अडवण्याचा प्रयत्न केला असता, अज्ञात चोरांनी दुसऱ्या कारला धडक दिली आणि फिल्मी थरारात बेंगळुरू शहराकडे पळ काढला. तात्काळ पाठलाग करत अखेर बेंगळुरू पोलिसांनी ब्रेझा कार ताब्यात घेतली.
ही संपूर्ण कारवाई पाथरी पोलीस उपविभागीय अधिकारी मा. श्री. टिपरसे, पोलीस निरीक्षक श्री. महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक माजिद शेख आणि पोह. १३५७ थोरे यांनी अचूक नियोजनातून ४८ तासांत यशस्वीरित्या पूर्ण केली.
या कारवाईबद्दल पाथरी पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत असून, त्यांच्या कार्यक्षमतेमुळे नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल