साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती डॉक्टरांच्या हस्ते अभिवादन करून साजरी

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी

आज राष्ट्रजन फाउंडेशन परभणीच्या वतीने साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे पुतळा स्मारक परभणी शहर बस स्टँड परिसर येथे लोकशाहीर साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त अभिवादन पूजन करून जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रजन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सल्लागार आयुर्वेदिक व नाडी तज्ञ डॉ.गोविंद कामटे प्रमुख पाहुणे राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे शहर महानगर कार्याध्यक्ष डॉ.अनिल कांबळे,ब्राह्मणगाव ग्रामपंचायत सदस्य दादाराव कांबळे, स्वच्छता दूत कावळे मामा संयोजक राष्ट्रजन फाउंडेशन संस्थापक व अध्यक्ष गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर,प्रवीण जोंधळे टाकळगव्हाणकर आदी मान्यवर उपस्थित होते,मागील 2013 पासून लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती व पुण्यतिथी उत्साहा मध्ये साजरी केले जाते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे की जय ही घोषणा देऊन कार्यक्रम संपन्न झाला अशी माहिती राष्ट्रजन फाउंडेशन अध्यक्ष नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकाद्वारे पत्रकारांना दिली.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल