स्वराज्य वार्ता प्रतिनिधी दिनेश दिलीप सूर्यराव
मुरबाड तालुक्यातील धसई गाव हे ऐतिहासिक व जुनी महत्त्वाची व्यापारी बाजारपेठ तसेच डिजिटल पेमेंट व कॅशलेस साठी ओळखले जाणारे गाव आहे. धसई येथे दर सोमवारी मोठ्या प्रमाणात आठवडी बाजार भरतो. हा बाजार मुळात परिसरातील आदिवासी तसेच पंचक्रोशीतील गावांतील नागरिकांसाठी एकमेव मुख्य बाजारपेठ आहे. तसेच या बाजारपेठेमध्ये विद्यालय, माध्यमिक विद्यालय, शाळा, सरकारी हॉस्पिटल आहेत मात्र दुर्दैवाने, बाजारपेठेतील काही दुकानदारांकडून रस्त्यालगत व महाविद्यालयाच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येतो. ही जागा प्रवासी जिप स्टॅन्डलगत असल्यामुळे त्या ठिकाणी प्रचंड दुर्गंधी पसरलेली असून प्रवाशांनाही याचा फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याच रस्त्यावरून दररोज शेकडो नागरिक, विद्यार्थी ये-जा करतात तसेच उपचारासाठी सरकारी हॉस्पिटलमध्ये रुग्ण येत असतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या सदर जागाही डम्पिंग ग्राउंड साठी आरक्षित नसली तरी या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड सारखे स्वरूप प्राप्त झाले असून ग्रामपंचायतीकडून स्वच्छतेकडे कोणतेही लक्ष दिले जात नाही. असे खरेदीसाठी जाणाऱ्या व स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. नागरिकांची समस्या लक्षात घेऊन मुरबाड तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी धसई ग्रामपंचायतीस पत्रव्यवहार करून खालील विषयांची मागणी केली आहे. सदर ठिकाणचा कचरा तात्काळ हटवावा. बाजारपेठेतील दुकानदारांना कचरा टाकण्यास प्रतिबंध करण्यात यावा. स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियमित नेमणूक करून परिसराची स्वच्छता राखावी. सरकारी रुग्णालय, जिप स्टॅन्ड व महाविद्यालय मार्गावर कायमस्वरूपी कचरा व्यवस्थापनाची व्यवस्था करण्यात यावी. ह्या चार मुद्द्यांची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यात यावी. या अगोदर सरळगाव ग्रामपंचायत त्यानंतर मुरबाड तालुका शहर आणि आता धसई ग्रामपंचायत ला स्वच्छते बाबत नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी निवेदन दिले आहे . धसई बाजार पेठेतील कचऱ्याचे समस्या चे निराकरण झाले नाही तर मनसे मुरबाड तालुका अध्यक्ष अरुण वारघडे , उपतालुका अध्यक्ष आकाश दळवी, विभाग अध्यक्ष प्रणव भिडे, मनविसे तालुका सचिव गिरीश म्हाडसे यांनी ग्रामपंचायत येथे निवेदन देत बाजार पेठेतील कचऱ्याची समस्या दूर करावे नाहीतर मनसे आपल्या दालनात तीव्र आंदोलन करेल याचे निवेदन दिले.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






