कपडे घेण्यासाठी पैसे मागितले असता मित्राने पैसे दिले नाही म्हणून दगडाने ठेचून केला खून

स्वराज्य वार्ता उपसंपादक उमेश वैद्य

आष्टी पोलिसांनी तब्बल २४ तासांच्या आत आरोपीला ठोकल्या बेड्या

आष्टी : परतूर तालूक्यातील लिखित पिंपरी येथे कपडे घेण्यासाठी पैसे न दिल्या मुळे मित्रांनीच मात्राचा खून केल्याची घटना परतूर तालुक्यातील लिखित पिंपरी शिवारात घडली आष्टी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यांना फोनद्वारे माहीती मिळाली की, मौजे लिखीत पिंपरी ता. परतुर शिवारात एक मृतदेह पडलेला आहे सदर माहितीच्या अनुषंगाने सपोनि, सुरवसे व पोलीस स्टाफ मौजे लिखीत पिंपरी शिवारात रवाना झाला मिळालेल्या माहितीची खात्री केली असता सदर मृतदेह हा लक्ष्मण गुलाबराव कदम वय ३१ वर्ष रा. लिखीत पिंपरी याचा असल्याचे समजले. त्यानंतर सर्व प्रथम घटनास्थळाची फॉरेन्सिक टीमच्या मार्फतीने पाहणी केली घटनास्थळावरुन सपोनि. सुरवसे यांनी आरोपी श्रीराम पांडुरंग दराडे यांनी लक्ष्मण गुलाबराव कदम यांचा खुन करण्यासाटी वापरलेला एक अंदाजे २० किलोग्रॅम वजनाचा, दोन ठिकाणी रक्ताचे डाग असलेला दगड जप्त केला. तसेच घटनास्थळावर दोन प्लास्टिक ग्लास, दोन रिकाम्या देशी दारुच्या बाटल्या व एक रिकामी बिसलरी जप्त केली तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलीस सापळा रचुन संशयित आरोपी श्रीराम पांडुरंग दराडे रा. अडगाव (दराडे) ता. सेलु ह. मु. लिखीत पिंपरी ता. परतुर यास ताब्यात घेतले. त्याने प्रथम उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्यास पोलीस स्टेशनला आणुन विश्वासात घेऊन विचारपुस केली असता त्याने सांगितले की, मी व मयत लक्ष्मण कदम सोबत सेलु येथे एका बँकेत गेलो. तेथे लक्ष्मण याने त्याच्या पत्नीचे सोन्याचे झुंबर ठेवुन ३३,००० रुपये घेतले. त्यानंतर आम्ही लिखीत पिंपरी शिवारातील एका शेतात पत्राच्या शेडमध्ये बसुन दारु पिली. दारु पिल्यानंतर मी मयत लक्ष्मण कदम यास कपडे घेण्यासाठी पैसे मागितले, तेव्हा त्याने मला पैसे दिले नाही. तसेच दोन वर्षापुर्वी लक्ष्मण कदम याने मला मारहाण केल्याचे माझ्या लक्षात आले. मला त्याच्याकडील पैसे घ्यायचे होते तसेच जुन्या भांडणाचा राग माझ्या मनात होता. म्हणून मी लक्ष्मण कदम हा झोपी गेल्यानंतर तेथे जवळच पडलेला एक मोठ्या आकाराचा दगड उचलुन त्याच्या डोक्यात मारुन त्याचा खुन केला.

त्याचा श्वास बंद झाल्याची खाञी झाल्यानंतर मी त्याच्या खिशातील ३२५०० रुपये घेऊन तेथुन लक्ष्मण हिंगे महाराजांच्या मठात पळुन गेलो. तेथे गेल्यानंतर मी माझे रक्त लागलेले कपडे धुवुन टाकले व पैसे एका बाथरुम मध्ये लपवून ठेवले. असे सांगुन गुन्ह्याची कबुली दिली. आरोपोकडुन एकुण ३२५०० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.याबाबत मयताची पत्नी गोकुळा लक्ष्मण कदम रा. लिखीत पिंपरी ता. परतुर यांच्या तक्रारीवरुन पो.स्टे. आष्टी येथे गु.र.नं. १६५/२०२५ कलम १०३ भारतीय न्याय संहिता प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास सपोनि. गणेश सुरवसे हे करत आहेत.सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. अजयकुमार बन्सल साहेब, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. खांबे साहेब, यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. श्री. गणेश सुरवसे, पोउपनि. अजित चाटे, गोपीनाथ कांदे, पोलीस स्टाफचे पोलीस अंमलदार, रामदास शेळके, शाम गायके, राणा पांढरे, अविनाश चव्हाण, दिपक पवार, बन्सी पानजंजाळ, डिगांबर बादाडे, अशोक कावळे, राहुल वाघमारे, विनोद वाघमारे, महिला पोलीस अंमलदार वर्षा रिड्ढे यांच्या पथकाने केली आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल