स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी
पाथरी विधानसभा मतदार संघातील बहुतांशी गावात दोन तीन वेळा अतिवृष्टी झाली, त्यामुळे पिके, घरे, जनावरे यांचे मोठे नुकसान झाले आहे, प्रत्येक शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यापेक्षा अतिवृष्टी ग्रस्त भागातील शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत देण्याबाबत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांची भेट घेणार असून महसूल व कृषी विभागाने तसे सक्षम तांत्रिक अहवाल तयार करावेत व वरिष्ठ स्तरावर सादर करावेत असे निर्देश आ राजेश विटेकर यांनी आज पाथरी येथे घेतलेल्या मतदार संघातील आढावा बैठकीत महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले, जनतेच्या विविध प्रश्नी आ राजेश विटेकर यांच्या उपस्थितीत आज पाथरीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते,
संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यासाठी येत्या आठवड्यात महसूल सप्ताह अंतर्गत शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे त्यात अश्या लाभार्थ्यांनि सहभाग नोंदवून आधार व बँक खाते जोडणी करून घ्यावी असे उपजिल्हाधिकारी संगीता चव्हाण यांनी स्पष्ट केले, कामगार विभागातील अधिकाऱ्यांनी केलेल्या सोयीनुसार मंजुर्या मुळे खरे लाभार्थी वंचित राहिलेले आहेत अशा तक्रारी येत आहेत, वंचित राहिलेल्या लाभार्थ्याना लाभ मिळवून देण्यासाठी, तालुका निहाय कॅम्प आयोजित करण्यात येतील असे जिल्हा कामगार अधिकारी कराड यांनी सांगितले बैठकीस माजी सभापती दादासाहेब टेंगेसे अनिल नखाते, संजू काका रनेर, राजेश ढगे, आधी प्रमुख पदाधिकारी यांच्यासह उपजिल्हाधिकारी संगीता चव्हाण, तहसीलदार हंडेश्वर , माचेवाड, कावरखे, गटविकास अधिकारी मधुकर कदम, यांच्यासह पाथरी विधानसभा मतदारसंघातील पाथरी मानवत व सोनपेठ तालुक्यातील सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते
तिन्ही तालुक्यातील हजारो शेतकरी , नागरिक यांनी अतिवृष्टी, संजय गांधी व इतर निराधार योजना, घरकुल योजना, पांदन रस्ते, पाणीपुरवठा योजना, रस्ते व पूल, कृषी विभाग, आरोग्य विभाग, कामगार विभाग एस टी महामंडळ, यांनी या विषयावर आपल्या तक्रारी मांडल्या त्यापैकी काहीची सोडवणूक झाली तर ज्या विषयांची सोडवणूक झाली नाही अश्या व इतर विषयाबाबत पुढील आठवड्यात जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येणार असल्याचे आ राजेश विटेकर यांनी सांगितले,
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






