आदिशक्ती संत मुक्ताबाई पालखी आगमन सोहळा मुक्ताईनगरमध्ये अभूतपूर्व स्वागत

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी किरण पाटील 

आदिशक्ती श्री संत मुक्ताई अंतर्धान समाधीस्थळ श्रीक्षेत्र कोथळी ता.मुक्ताईनगर येथून 6 जून पासून आषाढी वारी पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी गेलेली आई साहेबांची पालखीचे बुधवारी दि.30 जुलै 2025 रोजी स्वस्थळी आगमन झाले. त्यानिमित्य पालखी सोहळा उत्सव समिती व पंचक्रोशीतील नागरिकांच्या उस्फुर्त सहभागाने डोळ्यांचे पारणे फेडणारी भव्य वारकरी सांप्रदायिक दिंडी स्पर्धेच आयोजन करण्यात आलेले होते. स्पर्धेतील 102 भजनी मंडळांनी भक्तीचा मळा फुलवून संत भूमी मुक्ताईनगरी ला टाळ मृदंग व हरिनामाच्या गजराने पुलकित केले होते. या अद्भुत सोहळ्याने मुक्ताईनगरीत अभूतपूर्व स्वागत झाले. शेकडो वर्षाची परंपरा जोपासत वारकरी संप्रदायातील मानाचा संत मुक्ताई पालखी सोहळा मुक्ताईनगर ते पंढरपूर व परत प्रदीर्घ प्रवासानंतर रविवारी मुक्ताईनगरीत दाखल झाला. त्यानिमित्त नवीन मंदिर ते जुने मंदिर भव्य वारकरी सांप्रदायिक दिंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. स्पर्धा बाल ,पुरुष व महिला अशा तीन गटात पार पडली. वेगवेगळे बक्षीसांनुसार बालगट प्रथम बक्षीस 5555 रु.(दीपक साळुंखे) दुसरे बक्षीस 3333 रु(गणेश महाराज पाटील विटवेकर) तिसरे बक्षीस 2222 रु.(शशिकला सोनवणे) तर महिलागटामध्ये प्रथम बक्षीस 11,111रू (धनंजय एदलाबादकर) दुसरे बक्षिस 7777/- रु. (गजानन पाटील) तिसरे बक्षीस 5555/रु योगेश मनसुटे) पुरुष गटामध्ये प्रथम बक्षीस 11111/- (गजानन सुरंगे) दुसरे बक्षीस 7777/(प्रल्हादराव पाटील) तिसरे बक्षीस 5555/- (रामभाऊ झांबरे) अशा स्वरूपात होते तर प्रत्येक सहभागी भजनी मंडळास प्रोत्साहन पर बक्षीस व प्रमाणपत्र तसेच प्रत्येक सहभागी भजनी मंडळांस पालखी आगमन सोहळा समिती वतीने मानधन पर 1000 रू. देवून भजनी मंडळाचा सत्कार करण्यात आला.
दिंडी स्पर्धेत विजेते :
बालदिंडी गट प्रथम ~ संत मुक्ताई कन्या बाल भजनी मंडळ, (वाघोळा ता. मलकापूर)
द्वितीय ~ संत मुक्ताई वारकरी शिक्षण संस्था बाल भजनी मंडळ (कोथळी ता. मुक्ताईनगर)
तृतीय ~ मुक्ताई कन्या भजनी मंडळ (म्हैसवाडी)
महिला दिंडी गट : प्रथम ~ संत वियगी महाराज भजनी मंडळ (बनसोडा ता. संग्रामपूर)
द्वितीय ~ संत मुक्ताई भजनी मंडळ (पिंप्रीअकराऊत)
तृतीय ~ मरी माता भजनी मंडळ (चारठाणा)
पुरुष गट: प्रथम ~ रुपलाल महाराज भजनी मंडळ (वरुड बकाल )
द्वितीय : गजानन महाराज भजनी मंडळ (दाताळा ता.मलकापूर)
तृतीय ~ हनुमान भजनी मंडळ (बेलाड ता. मलकापूर)
दिंडी स्पर्धेत परीक्षक म्हणून विनायक पाटील, राजेश महाराज (बंभाळा), श्रीरंग रावते(अकोला) , राजेंद्र संभारे (मलकापूर) यांनी काम पाहिले.
संत मुक्ताई आदर्श वारकरी पुरस्कार :
संत मुक्ताईचे निष्ठावान वारकरी हरिभक्त परायण रतीराम महाराज नागरूत (खामखेडा) यांना संत मुक्ताबाई आदर्श वारकरी पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले पुरस्काराची रक्कम 11000 रोख होती. मानपत्र शाल श्रीफळ देऊन नागरुत यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.श्रीक्षेत्र मुक्ताईनगर,नवीन मुक्ताई मंदिर येथून सकाळी दहा वाजता स्पर्धेला सुरुवात होऊन मुख्य रस्त्याने बस स्टॅन्ड परिवर्तन चौक, गजानन महाराज मंदिर आस्थानगरी मार्गे जुने मंदिर,श्रीक्षेत्र कोथळी येथे सोहळ्याचा समारोप झाला. स्पर्धेचे बक्षीस वितरण हरिभक्त परायण रविंद्र हरणे महाराज यांच्या काल्याचे किर्तनानंतर संत मुक्ताई संस्थान चे अध्यक्ष भैय्या साहेब ॲड रवींद्र पाटील, माजी आमदार अरुणदादा पाटील, विशाल महाराज खोले, सम्राट पाटील आदींसह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रवर्तन चौकात,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर शिवसेना परिवार तर्फे पालखी सोहळ्याचा स्वागत पुरुष महिला व बाल गटातील दिंडी सोहळ्यातील विनेकरी यांचा रुमाल टोपी, शाल, श्रीफळ तसेच प्रभू श्रीरामाचा फोटो देवून सत्कार करण्यात आला तर महिला गटातील दिंडी सोहळ्यातील महिला विनेकरी यांना पैठणी साडी चोळी , पुष्पहार घालून सत्कार आ.चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.कुबेर गृप तर्फे देखील नाश्ता तसेच संत मुक्ताईची प्रतिमा भेट दिली तसेच अभुतपूर्व सजावट करून पुष्पवृष्टी करण्यात आली. सदाशिव पाटील यांच्यातर्फे वारकऱ्यांना खिचडीचा महाप्रसाद सेवा देण्यात आली तर कृषी उत्पन्न बाजार समिती, राजेंद्र हिवराळे यांचेकडून अहिल्यादेवी होळकरनगर येथे तसेच मुस्लिम समाज बांधवांकडून तसेच पालखी मार्गावर विविध नागरिकांतर्फे फराळ, केळी ,चहा व बिस्कीट पुडे तसेच पिण्याचे पाणी वाटप सेवा करण्यात आली

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल