स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी
परभणी:-नुकतेच महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गड किल्ल्यांची ऐतिहासिक जागतिक वारसा म्हणून नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर पाथरी तालुक्यातील वाघाळा या गावकुसातील चित्रकार सुशील घुंबरे यांनी स्वहस्ते बनवलेले रायगड किल्ल्याची प्रतिकृती असलेले कॅनव्हास पेंटिंग मंगळवार २९ जुलै रोजी मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांच्या दालनात कॅबिनेट बैठक संपल्या नंतर परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री ना मेघनादिदी बोर्डिकर यांच्या पुढाकारातून मुख्यमंत्र्याला भेट म्हणून दिले.
या वेळी मंत्री ना गिरिश महाजन,ना अतुल सावे,आ मोनिकाताई राजळे,आ सिमाताई हिरे,आ सुरेश धस, रणजित नाईक निंबाळकर,आदी मान्यवरांची उपस्थिती होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून महाराष्ट्राचा राज्य कारभार चालवणारे सन्मानीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना आज अतिशय उत्कृष्ट असे छत्रपती शिवाजी महाराज व किल्ले रायगडाची प्रतिकृती असलेले भव्य असे स्वहस्ते बनवलेले कॅनव्हास पेंटिंग चित्रकलेचे पदविधर असलेल्या सुशिल घुंबरे या परभणी जिल्ह्यातील वाघाळा ता. पाथरी येथील या चित्रकाराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेट दिले. या पेंटिंगला “जपतो आम्ही शिवछत्रपतीचां वारसा” असे नाव देण्यात आलेे आहे.
राज्यसरकारच्या विशेष प्रयत्नाने काही दिवसांपुर्वी स्वराजातील १२ गडकिल्ल्यांना युनो ने जागतिक वारसास्थळाच्या यादीत समाविष्ट केले आहे. याचा आनंद महाराष्ट्रासह देशातील सर्व शिवप्रेमींना झाला आहे. राज्यांच्या राज्यमंत्री तथा परभणीच्या पालकमंत्री ना.मेघनाताई बोर्डिकर यांनी वाघाळा ता.पाथरी गावचे चित्रकार सुशिल घुंबरे यांना त्यांच्या कलेला वाव मिळावी म्हणून छत्रपती शिवराय व किल्ले रायगडाची कलात्मक अशी एक पेंटिंग तयार करण्यास सांगितले होते. सुशील घुंबरे यांनी अगदी कमी वेळेत हे अतिशय सुंदर असे शिवाजी महाराजांचे पेंटिंग तयार केले. आज ते पेंटिंग जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना दिले असता मुख्यमंत्र्यांना हे पेंटिंग खुप आवडले मुख्यमंत्र्यांनी परभणीचे चित्रकार सुशिल घुंबरे यांच्या कलेच भरभरून कौतुक केले. सुशिल घुंबरे यांनी रेखाटलेले हे कॅनव्हॉस पेंटींग आता थेट मुख्यमंत्र्यांच्या दालनातील भिंतीवर दिसणार आहे. या वेळी मुख्यमंत्री ना देवेंद्रजी फडणविस, परभणीच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्यासह उपस्थित भाजपा युवा मोर्चाचे हनुमान घुंबरे,चित्रकार सुशिल घुंबरे यांनी या कलाकृती सह फोटो घेतला.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






