स्वराज्य वार्ता प्रतिनीधी किरण पाटील
मंगळवार दिनांक 29 जुलै रोजी मुक्ताईनगर तहसील कार्यालयात दुपारी 01:00 वाजता आमदार चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांसमवेत मुक्ताईनगर तहसीलदार यांचे दालनात गेल्या सहा जून पासून गेलेल्या संत मुक्ताई आषाढी परतवारी पालखीच्या नियोजनासंदर्भात आमदार चंद्रकांत पाटील यांनी बैठक घेतली. या बैठकीला तहसील कार्यालय पोलीस प्रशासन आरोग्य विभाग व महावितरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. संत मुक्ताई नवीन मंदिर मुक्ताईनगर व कोथळी येथील मूळ मंदिर असा तीन किमी चा पायी प्रवास असेल यामध्ये शेकडो दिंड्या व हजारो वारकरी या पालखीच्या स्वागतासाठी शहरात येतील. तसेच या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी भव्य दिंडी स्पर्धेचे आयोजन केले गेले आहे महिला, पुरुष व बालगट या तीन गटात या दिंड्या पालखीसोबत सहभागी असतील त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होईल. त्या नियोजनासंदर्भात पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन व मुक्ताईनगर नगरपंचायत तसेच महावितरण विभागाला आमदार चंद्रकांत पाटलांनी सूचना दिले आहे. शहरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून अवजड वाहतूक शहरा बाहेरून वळवणे यासाठी व बंदोबस्त लावण्यासाठी पोलीस निरीक्षक यांना आमदारांनी सूचना केल्या. तसेच आरोग्य विभागाला संत मुक्ताई नवीन मंदिर व जुने मंदिर या ठिकाणी आरोग्य पथक तैनात ठेवायला सांगितले व पालखीसोबत देखील फिरते आरोग्य पथक तैनात असणार आहे. तसेच नगरपंचायतीला देखील शहरात स्वच्छता ठेवण्याचे व इतर अडी-अडचणी सोडवण्याचे आदेश आमदारांनी दिले. महावितरणच्या कर्मचारी यांना देखील त्यांनी विजेच्या संदर्भात योग्य त्या खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या. पालखीसाठी मुक्ताईनगर शहरात 55 कर्मचारी पाच अधिकारी चोरी प्रतिबंधात्मक पथक व वाहतूक नियंत्रण पत्रक असा बंदोबस्त राहणार असल्याचे पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांनी यावेळी सांगितले. यावेळी बैठकीला तहसीलदार गिरीश वखारे, नायब तहसीलदार निकेतन वाळे, पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ योगेश राणे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ अमितकुमार घडेकर, नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी सुभाष जानोरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख छोटू भोई, शिवसेना जिल्हा संघटक सुनील पाटील, युवा सेना जिल्हाप्रमुख पंकज राणे, विधानसभा संघटक महेंद्र मोंढाळे तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि महावितरण चे अधिकारी व इतर विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






