स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी
पाथरी विधानसभा मतदार संघातील जनतेच्या विविध प्रश्नी आ राजेश विटेकर यांच्या उपस्थितीत पाथरीत महत्वपूर्ण आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे , गुरुवार दिनांक 31 जुलै रोजी सकाळी अकरा वाजता पंचायत समिती सभागृहात ही बैठक होणार आहे या बैठकीस
पाथरी विधानसभा मतदारसंघातील पाथरी मानवत व सोनपेठ तालुक्यातील तहसिलदार
, कार्यकारी अभियंता, मृद व जलसंधारण विभाग परभणी. गट विकास अधिकारी,तालुका कृषी अधिकारी,मुख्याधिकारी, नगर परिषद उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम,उपअभियंता, जायकवाडी पाटबंधारे ,
उप अधिक्षक, भूमिअभिलेख कार्यालय,तालुका आरोग्य अधिकारी, वैदयकिय अधिक्षक, ग्रामीणरुग्णालय , उपअभियंता, वीजवितरण कंपनी , तालुका क्रिडाअधिकारी, तालुका कामगार अधिकारी, एकात्मिक बालविकास अधिकारी, पशुवैदयकिय अधिकारी, व्यवस्थापक, म.रा.प. महामंडळ उपविभाग पाथरी असे तिन्ही तालुक्यातील विभाग प्रमुख असलेले अधिकारी उपस्थित राहणार आहेत, अतिवृष्टी, संजय गांधी व इतर निराधार योजना, घरकुल योजना, पांदन रस्ते, पाणीपुरवठा योजना, रस्ते व पूल, कृषी विभाग, आरोग्य विभाग, कामगार विभाग एस टी महामंडळ, यांच्या योजना व लाभ मिळण्याबाबत नागरिक,शेतकरी यांना मोठ्या प्रमाणावर अडचणी येत आहेत, अशा तक्रारी जनता दरबार व दौऱ्यावर असताना जनतेतून होत आहेत, त्या कामकाजात सुसूत्रतता आणण्यासाठी व जनतेची कामे होण्यासाठी सर्व विभागप्रमुख यांची बैठक घेण्यात यावी अशी सूचना आ राजेश विटेकर यांनी पाथरी उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण यांना केली होती त्यावरून ही बैठक होणार आहे,
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






