स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी
दि.29 जुलै रोजी दुपारी 12 वा. पंचायत समिती कार्यालय सभागृहात खरीप हंगाम पिक कापणी प्रयोग प्रशिक्षण ग्राम पंचायत अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी यांना देण्यात आले यावेळी तालुका कृषी अधिकारी श्री गोविंद कोल्हे,विस्तार अधिकारी कृषी श्री संदीपान घुंबरे व कृषी पर्यवेक्षक श्री सुनील मानोलीकर यांनी मार्गदर्शन करून प्रयोग बाबत सविस्तर माहिती दिली तसेच प्रत्यक्ष फिल्डवर कसा पिक कापणी प्रयोग करायचा याचे डेमो दाखवून उपयुक्त अशी माहिती दिली.यावर्षी पिक विमा पिक कापणी प्रयोग वर मिळणार असल्याने पीक कापणी प्रयोग बाबत खबरदारी घेऊन उत्पन्न बाबत पारदर्शकता ठेवण्याच्या सूचना श्री गोविंद कोल्हे यांनी दिल्या.यावेळी नायब तहसीलदार श्रीमती एस ए पटवे,विमा तालुका प्रतिनिधी श्री सचिन पाटील उपस्थित होते प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी कृषी पर्यवेक्षक श्री एस एस उगले,ऑपरेटर श्री डुकरे यांनी परिश्रम घेतले.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






