स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने पाथरी येथे रक्तदान शिबीर
भिषण आपघात,महिला प्रसुती,ईतर घटना वेळी रक्ताची गरज भासते,तेंव्हा रक्तदान हे खरंच जीवनदान आहे याची प्रचिती येते.यामुळे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक दायीत्व या भुमीकेतून रक्तदान शिबीर घेतले आहे.रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी नागरीक,तरूणांनी नियमीतपणे रक्तदान करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन आमदार राजेशदादा विटेकर यांनी केले.
कै. स. गो. नखाते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, देवनांद्रा, पाथरी येथे शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी पाथरीच्या वतीने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराचे उद्घाटन आ.राजेशदादा विटेकर यांचे हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी जि.प.चे माजी सभापती दादासाहेब टेंगसे होते. प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिलराव नखाते, माजी सभापती महादेवराव जोगदंड, माजी उपसभापती,संजय रनेर,बाळासाहेब कोल्हे, मानवतचे माजी नगराध्यक्ष डॉ.अंकुश लाड, मानवत बाजार समितीचे सभापती पंकज आंबेगावकर,विजयकुमार घुंमरे,माजी नगरसेवक आकाश लहाने,किरण तळेकर, रामप्रसाद कोल्हे,विष्णुपंत काळे,राजेभाऊ ढगे,रमेश तांगडे,संतोष कोल्हे,गणेश दुगाने यांची उपस्थिती होती.
माजी मंत्री कै.स.गो.नखाते यांचे पुतळ्यास प्रारंभी अभिवादन करण्यात आले.अमृता सोळंके यांच्या संचाने सुमधुर आवाजात स्वागतगीत सादर केले.
यावेळी बोलतांना आ.विटेकर म्हणाले पाथरी तालुक्यातील अतिवृष्टीने झालेल्या शेत पिकांच्या व घरांच्या पडझडीच्या नुकसान सर्वेक्षण अहवालाचा पाठपुरावा करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे,याशिवाय तातडीने आर्थिक मदत मिळावी यासाठी जिल्हाधिकारी यांचेशी चर्चा केली गुरुवारी प्रशासनाची आढवा बैठक ठेवली आहे असे सांगितले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा रक्तदान शिबीराचे संयोजक अजिंक्य नखाते यांनी प्रास्ताविक केले.सूत्रसंचालन आर. बी. सोळंके यांनी केले. विष्णू भिसे यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी विठ्ठल थोरात, अक्षय सोळंके,संतोष कोल्हे, चंद्रकांत हरकळ, कृष्णा गिराम,कैलास शिंदे,तुकाराम शिंदे,पांडुरंग हारकळ व इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
जणांनी केले रक्तदान.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा 66 वा वाढदिवस असल्याने अजय दगडू गिरी, रामेश्वर तोंडे, रतन शिंदे, संतोष कोल्हे, अक्षय शेळके, प्रकाश हरकळ, संतोष चौरे, नामदेव गव्हाणे यांचेसह 66 जणांनी रक्तदान करून ईतरांपुढे आदर्श ठेवला.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






