स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी
शेतकरी कर्जमाफीच्या प्रमुख मागणीसाठी २४ जुलै रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चुभाऊ कडू याच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय कार्यकर्ते संपूर्ण महाराष्ट्र मध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात आले माजलगाव तालुक्यातील वसंतराव नाईक चौक परभणी फाटा येथे साकळी 11:30 वाजता चक्काजाम आंदोलनास सुरवात करण्यात आले हे आंदोलन दोन तास चालू होते या आंदोलनात शेतकरी तसेच दिव्याग बाधव, मेंढ्या सहित मेंढपाळ मालक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या काही महिन्यापासून प्रहार चे संस्थापक अध्यक्ष मा. बच्चुभाऊ कडू यांनी शेतकरी सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमाफीची मागणी शासनाकडे केली आहे त्यासाठी त्यांनी आमरण उपोषणही
केले नंतर पदयात्रा काढली आता कर्जमाफी बाबत प्रत्येकाने आवाज उठवणे गरजेचे असल्याने आंदोलनाच्या पुढील टप्पा म्हणून 24 जुलै रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात आले आंदोलनात कोणत्याही पक्षाचा झेंडा नाही केवळ शेतकरी, दिव्यांग, मेढपाळ, मछीमार, कर्मचारी याच्या विविध प्रश्नासाठी एकत्र येऊन शासनाकडे कर्जमाफीची मागणी जोर कस पणे मांडण्यासाठी दोन तास चक्काजाम आंदोलन केले आहे या आंदोलनामध्ये संघटनेचे नेते मा भाई गगाभिशन थावरे, एडवोकेट मा.नारायण गोले पाटील, काँग्रेसचे तालुकाप्रमुख मा नारायण होके पाटील, आझाद क्रांती सेनेचे मा.राजेजी घोडे, मौलाना आझाद युवा मंचचे जिल्हाध्यक्ष नुमान अली चाऊस, शेतकरी क्रांती सेनेचे योगेश कानडे, वीर शंभू संघटनेचे गणेश शिंदे , आजाद क्रांतीचे तालुकाध्यक्ष अशोक ढगे व पदाधिकारी तसेच आजी माजी सैनिक संघटनांनी मा.वसंतराव नाईक चौक परभणी फाटा माजलगाव येथे येऊन चक्काजाम आंदोलनात सहभागी होऊन जाहीर पाठिंबा दिला हे आंदोलन माजलगाव प्रहार
जनशक्तीचे तालुका अध्यक्ष गोपाळ पैजणे, नितीन कांबळे, भारत डोंगरे हरिचंद्र जाधव विजय जोगडे अशोक अर्जुन लक्ष्मण गरड, विकास जगताप,विलास लवाळे, श्रीराम कोरडे, युवराज राठोड, महादेव डाके, पांडुरंग कुकडे, गणेश नागणे, अनेक शेतकरी व दिव्यांग बांधव पदाधिकारी उपस्थित होते.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






