संत सावता माळी यांच्या पुण्यतिथी निमित्त अरणमध्ये श्रीफळ हंडी

स्वराज्य वार्ता उपसंपादक उमेश वैद्य

७३० वा संजीवन समाधी सोहळा: अरणमध्ये ५ हजार श्रीफळांची हंडी, मानकरी देहूकर कुटुंबासह हजारो भाविकांचा सहभाग

श्री क्षेत्र अरण (ता. माढा) येथे संत शिरोमणी सावता महाराज यांच्या ७३० व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त तुकाराम महाराज यांचे वंशज बाळासाहेब देहुकर महाराज यांच्या हस्ते श्रीफळ हंडी फोडण्यात आली. या सोहळ्याला अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अभिजीत पाटील, माजी सभापती भारत शिंदे, माजी सभापती शिवाजी कांबळे, रमेश बारसकर, सावता परिषदेचे कल्याणराव आखाडे, मृदुल माळी उपस्थित होते. ज्ञानोबा-तुकारामांचा जयघोष, टाळ मृदंगाचा गजर आणि वारकऱ्यांच्या उत्साहात श्रीफळ हंडी सोहळा चांगलाच रंगला. सुमारे अर्धा तास चाललेला हा नयनरम्य सोहळा उपस्थितांनी याची देहा याची डोळा पाहिला.श्रीक्षेत्र अरण या ठिकाणी सुमारे पाच हजार श्री फळांची हंडी बांधलेली असते. गिड्डे यांच्या या मानकऱ्यांच्य घरून समारंभपूर्वक हंडी आणून पारावर बांधली गेली. पांडुरंग व सावता महाराजांच्या पालखीसमोर रंगलेल्या या दही-काल्याच्या हंडीभोवती काही श्रद्धेचे नारळ बांधले गेले. ती हंडी फोडून हा सोहळा पार पडतो. पांडुरंगाच्या पालखीचा फडाचा मान आजरेकर परिवार यांचा आहे. संत तुकाराम महाराजांचे वंशज देहूकर कान्होबा देहूकर यांनी श्रीफळ हंडी फोडली.यावेळी श्रीफळहंडीचे नारळ प्रसाद म्हणून मिळविण्यासाठी तरुणांची धडपड पाहावयाला मिळाली. हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी संत सावता माळी परिसर व मंदिरावर, शिवाजी कांबळे यांचे निवासस्थान, ग्रामपंचायत कार्यालय, सभामंडप, यात्री निवास या इमारतींवर गर्दी केली होती. विठ्ठल भक्तांनी अरण येथे सावता महाराजांच्या समाधीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. महाराष्ट्रातून शेकडो दिंड्या, पालख्यांचा वैष्णव मेळावा पंढरपुरात हजेरी लावतो. परंतु कर्मयोगी सावता महाराजांच्या समाधी सोहळ्याला प्रत्यक्ष परमात्मा श्री विठ्ठल धावून आल्याने सावता महाराजांनी पेरलेला भक्तीचा मळा भाविकांनी फुलून जातो. भक्तांनी व वारकऱ्यांनी वाहिलेले नारळ बांधून ही श्रीफळ हंडी तयार करण्यात येते आणि हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत हा नयनरम्य श्रीफळ हंडी सोहळा श्री संत सावता माळी महाराज यांच्या अरण भूमीत साजरा केला. सोहळ्याचे नियोजन संत सावतेबुवा महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विठ्ठल गाजरे, सचिव विजय शिंदे, विणेकरी पोपट माने, चोपदार उत्तम नागटिळक, बबन चोपदार आदींनी केले होते. अरण (ता. माढा) येथील संत सावता महाराज संजीवन समाधी मंदिरासमोर हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. बुधवारी दुपारी बारा वाजता श्री विठ्ठल आणि संत सावता महाराज यांच्या पालखीची भेट संजीवन समाधी मंदिर येथे झाली.

 

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल