स्वराज वार्ता प्रतिनिधी दिनेश दिलीप सूर्यराव
कर्जत डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या वतीने कर्जत शहरातील वाहतूक व्यवस्थापनात मदतीचा हात पुढे करत कर्जत पोलिस ठाण्यास १०० बॅरिकेड्स सुपूर्त करण्यात आले. हा बॅरिकेड्स वाटप सोहळा बुधवार, २३ जुलै रोजी विठ्ठल मंदिर संस्थान सभागृह, दहिवली कर्जत येथे उत्साही वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमाला कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले, कर्जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे, सहाय्यक महिला पोलीस निरीक्षक मनिषा लटपटे हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमात नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे कर्जत पोलीस विभागास १०० बॅरिकेड्स अधिकृतपणे देण्यात आले. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सामाजिक कार्य संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे, तर देशविदेशात ही प्रसिद्ध आहे. अध्यात्मिक मार्गदर्शना सोबतच पर्यावरण रक्षण, स्वच्छता मोहिमा, आरोग्य शिबिरे, आणि वाहतूक नियमनासाठी मदत अशा विविध सामाजिक उपक्रमांतून प्रतिष्ठान सातत्याने कार्यरत असते. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांचे प्रमुख आप्पासाहेब धर्माधिकारी यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक भोसले यांनी पोलिस ठाण्याच्या वतीने नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाने मानपत्र देऊन सन्मानीत केले. यावेळी प्रतिष्ठानचे श्री सदस्य भगवान भोसले, श्रीधर बुंधाटे, अशोक भागित, विनोद येवले यांनी प्रतिष्ठानच्या वतीने स्वीकार केला. कार्यक्रमाची प्रस्तावना विकास चित्ते यांनी, तर खडे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी प्रतिष्ठानचे अनेक श्री सदस्य व नागरिक उपस्थित होते. हा उपक्रम कर्जत शहरासाठी सामाजिक सहकार्याचे उत्कृष्ट उदाहरण ठरला असून, पोलिस विभागाच्या माध्यमातून नागरिकांच्या सुरळीत वाहतुकीसाठी ही मदत उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
“वाहतूक कोंडी ही कर्जत शहरातील गंभीर समस्या आहे. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने दिलेल्या बॅरिकेड्स मुळे वाहतूक नियमन अधिक प्रभावीपणे करता येईल. हे बॅरिकेड्स विविध प्रमुख चौकांमध्ये वापरण्यात येणार आहेत. प्रतिष्ठानचे आभार मानत त्यांना मानपत्र सुपुत्र करीत आहोत.वाहनचालकांनी सुद्धा वाहतूक नियम पाळावेत. नो एन्ट्री, ओव्हरटेकिंग करून लेन तोडणे, रस्त्यावर वाहन पार्क करणे असे नियमांचे उलघंन करू नये असे संदीप भोसले, पोलिस निरीक्षक कर्जत पोलीस ठाणे यांनी आपल्या भाषणात सांगितले.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






