बॅलेट युनिट द्वारे वर्ग प्रतिनिधी निवड

स्वराज्य वार्ता प्रतिनीधी अहमद अन्सारी

PM SHRI जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मानवत येथे इयत्ता आठवी च्या विद्यार्थ्यांची वर्ग निवड करण्यात आली

लोकसभा, विधानसभा निवडणूक लोकशाही पद्धतीने ज्याप्रमाणे घेतले जाते त्याचप्रमाणे बॅलेट युनिट द्वारे निवडणूक घेण्यात आली.विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. माणिक घाटुळ, वर्गशिक्षक श्री. संजय पकवाने , शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष सौ. राणीताई गोलाईत यांच्या पुढाराकारातून विद्यार्थ्यांमध्ये मतदान जागृती व्हावी तसेच लोकशाही पद्धतीने सर्व निवडणुका कशा घेतल्या जातात ? याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून वर्ग प्रतिनिधी निवडीमध्ये उमेदवारी अर्ज भरणे, माघार घेणे मतपत्रिकेद्वारे मतदान करणे, मतमोजणी करणे आणि निकाल जाहीर करणे असा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला.
मतदान अधिकाऱ्यांपासून ते निकाल जाहीर होईपर्यंत ची सर्व कामे विद्यार्थ्यांनी केली.
*कु. श्रुती काळे* यांनी मतदान अधिकारी क्रमांक 1 ची भूमिका बजावली. यामध्ये विद्यार्थ्यांची हजेरीद्वारे ओळख पटवणे चे काम त्यांनी केले.
मतदान अधिकारी क्रमांक 2 चे कार्य *कु. प्राजक्ता दलाल* हिने पाहिले व मतदान अधिकारी क्रमांक 3 चे कार्य *शेख इफरा* यांनी पाहिले. यामध्ये विद्यार्थ्यांच्या डाव्या बोटाच्या तर्जनीला शाई लावणे, मतदान प्रक्रियेसाठी चिठ्ठ्या देणे इत्यादी कार्य त्यांनी केले.
वर्गामध्ये *मुख्यमंत्री म्हणून चि. संचित रामराव कदम* या विद्यार्थ्यांची सर्वाधिक मताने निवड करण्यात आली. तर *कु. अक्षता संतोष शिंद* या विद्यार्थिनीने सर्व द्वितीय मते मिळवून तिची *उप मुख्यमंत्री* म्हणून निवड करण्यात आली.
*मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे अभिनंदन* विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. माणिक घाटुळ, वर्गशिक्षक श्री.संजय पकवाने, विद्यालयातील शिक्षक श्री. शेख इरफान, सचिन निलवर्ण, राजाभाऊ येडके, दगडूराम बोरकर, केशव गिरी, नामदेव खिळदकर, रावसाहेब चिंचाणे, राजू लांडे, मारुती रोकडे, परमेश्वर बोडखे, श्रीमती गिरी मॅडम यांनी केले.
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी *वर्गशिक्षक श्री.संजय पकवाने* यांनी सहकार्य केले.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल