महादेव कोळी समाजाचा जात प्रमाणपत्राचे लवकरच कॅम्प घेणार-मुंजाराम गाडेकर

स्वराज्य वार्ता प्रतिनीधी किसन बी पवार

आठ दिवसांमध्ये कॅम्प लावण्याचा आमदार प्रकाश सोळंके याचा. शब्द

माजलगाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर महादेव कोळी समाज वास्तव्यास असून जात प्रमाणपत्र नसल्यामुळे अनेकांना रोजगारासाठी शासकीय नोकरीसाठी मुकावे लागत असून यासाठी माजलगाव तालुक्यातील महादेव कोळी समाजाच्या बांधवांनी जात प्रमाणपत्रासाठी आपापल्या फाईल गोळा करून जात प्रमाणपत्रासाठी सादर कराव्यात येत्या आठ दिवसांमध्ये कोळी समाजासाठी कॅम्प लावण्यात येईल असा शब्द आमदार प्रकाश सोळंके यांनी दिला आहे.
गेल्या अनेक वर्षापासून महादेव कोळी समाजाचे जात प्रमाणपत्र बंद असल्यामुळे अनेकांना शासकीय नोकऱ्या शैक्षणिक सुविधा आणि सवलती यापासून कोळी समाजाला वंचित रहावे लागत असून जात प्रमाणपत्राविना कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ माजलगाव तालुक्यातील बहुसंख्य संख्येने असलेल्या महादेव कोळी समाजाला मिळत नसल्याने महादेव कोळी समाजाचे तालुकाध्यक्ष मुंजा राम गाडेकर यांनी आमदार प्रकाश सोळंके यांची यासंदर्भात भेट घेऊन जात प्रमाणपत्राविषयी मुद्दा उपस्थित करून जात प्रमाणपत्राच्या मिळकतीसाठी प्रयत्न करावेत अशी विनंती केली असता आमदार प्रकाश सोळंके यांनी आठ दिवसांमध्ये समाजाच्या असणाऱ्या नागरिकांनी जात प्रमाणपत्रासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्राची पूर्तता करून फाईल तयार करून ठेवावी जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी मि स्वतः प्रयत्न करीन असा शब्द देत येत्या आठ दिवसांमध्ये जात प्रमाणपत्रासाठी कॅम्प लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचा त्यांनी सांगितले आहेत तालुक्यातील व माजलगाव मतदार संघातील महादेव कोळी समाजातील नागरिकांनी येत्या दोन दिवसात जात प्रमाणपत्र साठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्राची पूर्तता करून जात प्रमाणपत्र साठी सेतू सुविधा केंद्र मध्ये सादर करावी असे आवाहन मुंजा राम गाडेकर यांनी केले आहे

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल