स्वराज्य वार्ता प्रतिनिधी चंपतराव डाकोरे
आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष हभप राम महाराज पांगरेकर यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक श्री बालाजी मंदिर मालेगाव रोड तरोडा नांदेड येथे संपन्न झाली.
या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय सर्वानुमते संस्थेकडून पंढरपूर येथे निर्माण करण्यात येणाऱ्या धर्मशाळेचे बांधकाम करण्याचे कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी सर्व पदाधिकारी सोबत चर्चा करून निर्णय घेण्यात आला.
गेल्या सात वर्षापासून आम्ही वारकरी परिवाराच्या माध्यमातून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर असे अनेक उपक्रम गावागावांमध्ये राबविण्यात आले. परिवारातील अनेकांनी पंढरपूर येथे आपल्या हक्काची जागा व्हावी आणि तिथे आपली धर्मशाळा उभी रहावी असी इच्छा व्यक्त केल्यानंतर आम्ही वारकरी परिवारातील सर्व मार्गदर्शक, सल्लागार, संस्थापक सदस्य,राज्यस्तरीय,जिल्हास्तरीयतालुकास्तरीय,महिला आघाडी पदाधिकारी व सर्व गावातील शाखाध्यक्ष गावागावातील परिवाराचे सर्व पदाधिकारी किंबहुना आम्ही वारकरी परिवारावर प्रेम करणारे महाराष्ट्रातील सर्व साधक यांच्या अथक परिश्रमातून पंढरपूर येथे धर्मशाळेसाठी पंढरपूर नगरपालिका क्षेत्रात जागा घेण्यात आली. त्याच जागेवर बांधकामाचे भुमीपुजन साधुसंतांचा हस्ते करण्यात आले. त्या संदर्भाने धर्मशाळा बांधकामा संदर्भात पुढील नियोजन व बांधकाम करण्याचे कॉन्ट्रॅक्ट, देण्यासाठी तरोडा (खु.) नांदेड येथे बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत सर्वानुमते श्री राहुलजी महाडिक पंढरपूरकर यांना बांधकामाचे कॉन्ट्रॅक्ट देण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले.. याप्रसंगी संस्थेचे मार्गदर्शक श्री दतराम पा.एडके, आपल्या संस्थेला सर्वतोपरी सहकार्य करणारे श्री जगन्नाथ चक्रवार, आपल्या संस्थेचे बांधकामाचे पूर्ण काम पाहणारे (अर्थात नकाशा पासून बांधकामाच्या नियोजनापर्यंत) श्री प्रसाद पंढरपूरकर,संस्थेला सहकार्य करणारे श्री सतीश चितळकर, श्री सदाशिव जोशी, श्री बाबुराव पांगरेकर, श्री उत्तम बोपेवार सर, श्री लिंबाजीराव शिंदे, संस्थेचे कार्य महाराष्ट्रभर प्रसिद्ध करणारे श्री चंपतराव पा.डाकोरे व संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष श्री राम महाराज पांगरेकर,सचिव श्री व्यंकट महाराज माळकोठेकर,सहसचिव श्री प्रभाकर महाराज पिंपळगावकर, कोषाध्यक्ष श्री शिवाजी मदमवाड, संस्थापक सदस्य श्री गुलाब पा.उबाळे श्री प्रवीण महाराज पारडीकर, श्री संतोष पा. कदम,श्री हरिनाम पा. कदम श्री त्रिमुख पा. एडके, श्री भगवान पा.रहाटीकर तसेच इतर पदाधिकारी यामध्ये श्री दिनाजी सांगळे,श्री बालाजी पा.शिंदे,श्री बालाजी पा.पवार,श्री विठ्ठल पा.एडके उपस्थित होते.
असे प्रसिध्दी आम्हीं वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड महाराष्ट्र प्रसिद्धि प्रमुख चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांनी दिली
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






