श्री स्वामी समर्थ सेवेकरांचा एक कोटी महावृक्षारोपण व संवर्धन अभियान अंतर्गत जैवविविधता उद्यान आंबिवली पूर्व येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी दिनेश दिलीप सूर्यराव

 

कल्याण आंबिवली येथे परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने भव्य वृक्षारोपण सोहळ्याचे आयोजन ठाणे झोन अंतर्गत 20 जुलै 2025*रोजी *जैवविविधता उद्यान, एनआरसी प्लॉन्ट, आंबिवली पूर्वला आयोजित करण्यात आले होते पर्यावरण रक्षण व संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी असून निसर्ग देवतेची सेवा घडावी या हेतुने ठाणे झोन अंतर्गत स्वामी समर्थ सेवा केंद्रातील सेवेकरी* यांनी महावृक्षारोपन ,पर्यावरण रक्षण व संवर्धन अभियनासाठी ज्यांना आंबा, जांभूळ, कडू लिंब, वड, पिंपळ, साग, नारळ व औदुंबर इत्यादी वृक्ष दान करण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. या आवहनास प्रतिसाद देऊन आंबा, चिंच, जांभूळ, कडुलिंब व बांबूची रोपे, जांभूळ, वड, आंबा , नारळाची रोपे तसेच याबरोबरच बालसंस्कार च्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले सिडबॉल घेऊन आले होते . या महा वृक्षारोपण अभियानांतर्गत वृक्षांचे व सिडबॉलचे पूजन श्री सूक्त व भूसक्त म्हणून करण्यात आले. श्री स्वामी समर्थ महाराजांची साडेदहा च्या सुमारास सामुदायिक आरती घेण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी ग्लोबल वॉर्मिंगमुळे वातावरणात कमालीचा बदल कसा झाला आहे यावर भाष्य केले . मानवी आक्रमणामुळे जंगलतोड वाढल्याने वन्यजीव, पशु-पक्षी वातावरणाला धोका निर्माण झाला आहे. वृक्षतोड हे याचे प्रमुख कारण आहे. परिणामी, अलिकडे मानवाला याचे महत्त्व कळले असून, वृक्षारोपण करण्याकडे अधिकाधिक भर दिला जात आहे. वृक्षारोपण हे महत्त्वाचे आहेच. पण, त्यासोबत त्याचे संवर्धन ही खरी काळाची गरज आहे. वृक्षाचे संवर्धन झाले तरच भविष्यातील पर्यावरण अबाधित राहील, असे सांगितले. तदनंतर ठाणे झोन अंतर्गत उपस्थित असलेले सर्व सेवेकऱ्याच्या मदतीने निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या आंबिवली येथील एन आर सी प्लांट जैव उद्यान या जागेत वरील विविध 500 वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले व बाल संस्कार वर्गच्या विद्यार्थ्यांनी सीड बॉल सदर जागेवर टाकण्यात आले. सर्व सेवेकर्‍यांनी वृक्षारोपणाच्या या कार्यक्रमात सहभाग नोंदविला. याप्रसंगी पर्यावरण विभागाच्या ठाणे जिल्हा प्रतिनिधी तसेच ठाणे झोन अंतर्गत 18 विभागात कार्य करणारे प्रमुख प्रतिनिधी, पर्यावरण दक्षता मंडळ टिटवाळा तसेच के डी एम सी उद्यान अधीक्षक, समाजसेवक, सामाजिक कार्य करणाऱ्या संघटना तसेच ठाणे झोन अंतर्गत येणाऱ्या सेवा केंद्राचे सेवेकरी उपस्थित होते. वृक्षारोपणाच्या कार्यक्रमानंतर सर्वांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. ठाणे झोनअंतर्गत सर्व सेवेकर्‍याकडून करण्यात आलेली महा वृक्षारोपणाची सेवा परमपूज्य गुरुमाऊली व स्वामी समर्थांच्या चरणी रूजू करण्यात आली.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल