स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी
लातूर येथे छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री. विजय घाडगे व त्यांच्या सहकाऱ्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित गुंडांकडून भरदिवसा अमानुष मारहाण करण्यात आली. ही घटना केवळ एका व्यक्तीवरचा नव्हे, तर शेतकरी, बहुजन, आणि युवा शक्तीच्या आवाजावर झालेला योजनाबद्ध प्रहार आहे.या घटनेचा तीव्र निषेध करत मराठा सेवा मंडळ, संभाजी ब्रिगेड, छावा दल, मराठा महासंघ, शिवमुद्रा संघटना, मराठा परिवार, गोरक्षक संघटना, विद्यार्थी परिषद, व कृषी परिषद यांच्या संयुक्त नेतृत्वात प्रचंड आक्रोश आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयावर करण्यात आले.छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात राष्ट्रवादीचे नेते प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, कृषीमंत्री माणिक कोकाटे व सुरज चव्हाण यांच्या फोटो प्रतिमेला ना लाथा ,बुक्क्या, आणि जोडे मारण्यात आले.गुंडगिरी बंद करा शेतकरीद्रोह्यांना अटक करा लोकशाही झाकली का अशा जोरदार घोषणा देत कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढला.यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना आक्रमक निवेदन देण्यात आले आणि कारवाईची मागणी केली.
मुख्य मागण्या
1. छावा कार्यकर्त्यांवरील हल्ल्याची CID चौकशी तातडीने सुरू करावी.
2. सर्व गुन्हेगारांना अटक करून गंभीर गुन्हे दाखल करण्यात यावेत.
3. राजकीय अभय देणाऱ्या नेत्यांची चौकशी करण्यात यावी.
4. शेतकरी प्रश्न विचारणाऱ्या संघटनांना सुरक्षा व मान्यता मिळावी.
5. परभणी जिल्ह्यात “गुंडगिरी विरोधी सेल” स्थापन करावा.
या मागण्या संभाजी ब्रिगेड संघटनेच्या जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले
नितीन देशमुख – संस्थापक अध्यक्ष, मराठा सेवा मंडळ
गजानन जोगदंड – महानगराध्यक्ष, संभाजी ब्रिगेड
बालाजी मोहिते – जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड
रामदास अवचार – जिल्हाप्रमुख, छावा दल
सूर्यकांत मोगल – संस्थापक अध्यक्ष, शिवमुद्रा संघटना
संदीप गव्हाणे – जिल्हाप्रमुख, मराठा महासंघ
अमोल आवकाळे – मराठा परिवार परभणी
लोहट सुरेश – गोरक्षक
स्वप्नील गरूड – मराठा समन्वयक
पांडुरंग शिंदे – जिल्हाप्रमुख, विद्यार्थी परिषद
रमेश भाऊ देशमुख – मराठा समन्वयक
गोविंद इक्कर पाटील – जिल्हाप्रमुख, मराठा सेवा मंडळ
एकनाथ मोरे – अध्यक्ष, कृषी परिषद,विष्णू लोडे, कृष्णा अवकले, विशाल सूर्यवंशी, गणेश चोपडे पाटील या सर्व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती
लोकशाही आणि संविधानावर विश्वास ठेवत आम्ही शांततेच्या मार्गाने लढा देत आहोत.
परंतु जर न्याय न मिळाला, तर संविधानाच्या चौकटीत राहून आम्ही तीव्र आंदोलन छेडू!
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






