फळेगाव येथे ११ वी, १२ वी चे वर्ग सुरू होण्याचे मानस भरत दळवी सर यांनी केली छत्रपती शिक्षण मंडळाकडे मागणी

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी दिनेश दिलीप सूर्यराव

 

कल्याण तालुक्यातील फळेगाव येथे छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण यांचे दहावी पर्यंत शैक्षणिक वर्ग आहेत पुढील काळाची गरज लक्षात घेता इयत्ता ११ वी, १२ वी चे वर्ग सुरू करावेत अशी मागणी नुकतच मुरबाड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते भरत दळवी यांनी आपल्या मंचच्या माध्यमातून छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण यांच्याकडे केली आहे. सध्या कल्याण तालुक्यातील फळेगाव येथे इयत्ता १० वी पर्यंत वर्ग सुरू आहेत. भविष्यातील गरज व फळेगाव आणि परिसरातील पालकांची मागणी लक्षात घेऊन याठिकाणी ११ वी, १२ वी चे वर्ग सुरू करण्याची मागणी दळवी सर यांनी केली आहे. फळेगाव आणि परिसरातील विद्यार्थ्यांचा प्रवास खर्च वाचविणे, पालकांचा असणारा उत्स्फूर्त प्रतिसाद, मध्यवर्ती ठिकाण, परिसरातील विद्यार्थ्यांची संख्या, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास मधील अडचणी , शैक्षणिक प्रवासासाठी लागणारा खर्च लक्षात घेता सदर मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे. लवकरच फळेगाव येथे छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संस्थेद्वारा अकरावी बारावीचे वर्ग सुरू होणार असल्याचा मानस व्यक्त केला जात आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल