स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी
राष्ट्रजन फाउंडेशन परभणी च्या वतीने लोकशाहीर साहित्यरत्न डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन व पूजन दिनांक 18 जुलै २०२५ रोजी परभणी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा बस स्टँड परिसर येथे अभिवादन व पूजन करण्यात आले यावेळी राष्ट्र जन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय गो सेवक नितीन जाधव गोगलगावकर सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर आवरगंड मातंग समाजाचे नेते सुनील सुतारे नितीन जाधव मित्रपरिवार यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले याप्रसंगी राष्ट्रीय लोकसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी परभणी जिल्ह्यामध्ये शहरामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांचा पूर्ण पुतळा आहे पण या ठिकाणी अनेक सुविधा कमी आहेत निवडणुकीच्या काळामध्ये मोठमोठाले नारळ फोडून भव्य दिव्य उद्घाटन सुशोभीकरण करण्याचे पण आणखीन पण इथे काहीच सुविधा नाही वरी जाण्यासाठी अभिवादन करण्यासाठी सीडी नाही त्याचबरोबर खाली फरशी नाही कोणत्याच प्रकारची इथे सुविधा नाहीत तर प्रशासनाने येथे व ज्यांनी ज्यांनी उद्घाटनला उपस्थिती लावली होती अशा पाहणी करून तात्काळ पुतळ्याचे सुशोभीकरण करावे अशी आव्हान सर्व जनतेला व नागरिकांना व प्रशासनाला करण्यात येत आहे हीच खरी स्मृतिदिन साजरा होय अशी माहिती राष्ट्र जन फाउंडेशन परभणी अध्यक्ष गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार माहिती दिली
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल आवटे ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!







