स्वराज्य वार्ता प्रतिनिधी किसन बी पवार
महिला बालक ज्येष्ठ नागरिक आणि समाजातील दुर्बल घटकावरील अत्याचारांना प्रतिबंध घालण्यासाठी आणि त्यांना त्वरित मदत मिळावी पैशाचा अपव्यय टाळावा या दृष्टिकोनातून प्रत्येक उपविभागीय कार्योलयात आता स्थापना करण्यात आली असून या ठिकाणी कार्यरत भरोसा सेलवर जिल्हा भरोसा सेलचे थेट नियंत्रण राहणार आहे याशिवाय उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचेही याच्यावर थेट नियंत्रण राहणार आहे बीड जिल्ह्यातील नागरिकांचा पैसा आणि श्रम वाचण्यासाठी या सेलची स्थापना करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी दिली आहे जिल्ह्यातील महिला बालक ज्येष्ठ नागरिक आणि समाजातील दुर्बल घटकावरील अत्याचारांना प्रतिबंध घालण्यासाठी त्यांना त्वरित मदत देण्यासाठी आणि त्यांचे समुपदेशन करून कायदेशीर व मानसिक आधार प्रदान करण्यासाठी पोलिस दलाच्या वतीने भरोसा असेल तयार करण्यात आला आता ह्या सेल उपविभागीय स्तरावरही विस्तारित करण्यात आला असून या ठिकाणी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळे महिलांच्या सक्षमीकरणाला चालना मिळणार आहे कौटुंबिक वाद लैंगिक अत्याचार मानसिक त्रास घरगुती हिंसाचार यासारख्या संवेदनशील प्रकरणांमध्ये विविध व्यक्तींना मानवी दृष्टिकोनातून त्वरित मदत व सल्ला देणे हे भरोसा असेल चे काम आहे या सेलमध्ये प्रशिक्षित पोलीस अमलदार महिला कर्मचारी समुपदेशक सामाजिक कार्यकर्ते व गरजू नुसार वैद्यकीय सल्लागार यांचा समावेश असतो याद्वारे पीडित युक्तीना संरक्षण न्यायाने मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला जातो पूर्वी हा सेल जिल्हा स्तरावर असल्याने सीमा लगताच्या भागातील नागरिकांना अडचण होत होती यासाठी पैसा आणि वेळ दोन्हीही खर्च करावा लागत होता यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी आपल्या भरोसा सेल प्रत्येक उपविभागीय स्स्तरावर स्थापना केली आहे यासाठी बीड जिल्हा भरोसा सेलमध्ये प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक शालिनी गजभरे यांचा कायम असून अंबाजोगाई येथे शहर पोलीस ठाण्याचे एस पी कराड अंबाजोगाई ग्रामीणचे पी ए वाघमारे आष्टी येथे अमळनेर पोलीस ठाण्याचे ए पी शिंदे अंभोरा पोलीस ठाण्याचे एस डी खरमाटे माजलगाव येथे शिरसाळा पोलीस ठाण्याचे महिला. पोह.एस एस. चव्हाण गेवराई येथे चकलांबा पोलीस ठाण्याचे डी बी गुरसाळे तलवाडा पोलीस ठाण्याचे आर सी माने तर केज पोलीस ठाण्याचे सीमा निरडे व युसुफ वडगाव पोलीस ठाण्याचे सखू गीते यांची नियुक्ती केली आहे या अधिकाऱ्यांवर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे तसेच जिल्हा भरोसा सेलचे नियंत्रण राहणार आहे जेणेकरून नागरिकांना विश्वास पूर्ण सेवा मिळेल तसेच जिल्हास्तरावर व जिल्हा बीड तालुका स्तारावर एकच भरोसा असेल राहणार असून जिल्ह्यातील लोकांना न्याय देण्याचे काम याद्वारे करण्यात येईल तसेच नागरिकांचा पैसा आणि वेळ वाचेल असेही पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






