स्वराज्य वार्ता प्रतिनिधी दिनेश दिलीप सूर्यराव
मुरबाड पाठबंधारे विभागाची (जलसंपदा विभागाची) मुख्य कामे म्हणजे पाणी व्यवस्थापन, सिंचन योजनांची अंमलबजावणी, आणि पाण्याच्या उपलब्धतेनुसार सिंचन सुविधा पुरवणे. या योजनेसाठी दरवर्षी शासन करोड रुपये खर्च करत असतो मात्र हाच खर्च काही ठिकाणी पाण्यात वाहून गेल्याचे दिसते. शहापूर-मुरबाड या दोन तालुक्यांच्या सीमेवरून वाहणाऱ्या शाई नदीपात्रातील मौजे शिरोशी येथील ढाडरे ग्रामपंचायत हद्दीतील आणि खारांगण ग्रामपंचायत हद्दीमध्ये यंदाच्या वर्षी मृद व जलसंधारण विभागाकडून करोडोचा निधी खर्च करून दोन्ही ठिकाणी नदीपात्रात पाठ बंधारा बांधण्यात आले होते. मात्र पहिल्याच पावसात दोन्ही पाठ बंधारे चक्क पाण्यासोबत वाहुन गेल्याची घटना या भागात घडल्याने मनसेकडून मृद व जलसंधारण विभागाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली जात आहे. सदरील पाठ बंधारे फुटून पाण्याच्या प्रवाहात वाहिल्याने बंधाऱ्याच्या मध्ये काँक्रिट ऐवजी दगडीचा भरणा करण्यात आल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. यामुळे जलसंधारण विभाग हा सध्या या परिसरात हास्याचा विषय बनला आहे. याबाबत मनसेचे मुरबाड तालुका अध्यक्ष अरुण वारघडे यांनी मृद व जलसंधारण विभागाचे जिल्हा संधारणा अधिकारी फरीद खान यांना लेखी निवेदन देऊन तात्काळ कारवाईची मागणी केली आहे, अन्यथा मनसे आपल्या दालनात तीव्र आंदोलन करीत सदर भ्रष्ट कामांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन जिल्हा संधारणा अधिकारी यांच्या दालनात भरविण्यात येईल असा इशारा यावेळी मनसेकडून देण्यात आला आहे.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






