स्वराज्य वार्ता प्रतिनिधी चंपतराव डाकोरे पाटिल
नांदेड जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या दिव्यांग वयोवृध्दाना
सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकारच्या एडीआयपी आणि वयोश्री योजनेअंतर्गत, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (अलिम्को), जिल्हा प्रशासन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात नांदेड जिल्ह्यातील उपविभागीय कार्यालयांमध्ये मोफत कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधनांचे मोजमाप व नोंदणी शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.
या शिबिरासाठी नियोजन बैठक माझ्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या उपस्थितीत पार पडली.
शिबिरात लाभार्थ्यांना मिळणारे साहित्य
• दिव्यांगांसाठी: व्हीलचेअर, कुबड्या, काठ्या, तीनचाकी सायकल, रोलेटर, सीपी चेअर, एमआर किट, श्रावणयंत्र, ब्रेल किट, स्मार्टफोन, स्मार्ट केन इत्यादी.
• वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी: चालण्याची काठी, वॉकर, क्रचेस, व्हीलचेअर, कृत्रिम दात, चष्मे, श्रावणयंत्र.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
• आधारकार्ड
• दिव्यांगत्व प्रमाणपत्र (UDID)
• उत्पन्न प्रमाणपत्र/रेशनकार्ड
• पासपोर्ट साईज फोटो
• शालेय विद्यार्थ्यांसाठी शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र
विशेष सूचना:
शिबिरात युडीआयडी कार्ड, आरोग्य तपासणी व महसूल विभागाच्या शिबिरांचेही आयोजन करण्याचे निर्देश दिले आहेत.
जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार व अलिम्कोचे के.डी. गोटे यांनी शिबिराची सविस्तर माहिती दिली.
दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार व भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (अलिम्को) कानपूर संस्थेचे सदस्य के.डी गोटे तसेच सर्व संबंधित विभागाचे विभागप्रमुख आदीची उपस्थिती होती. तर जिल्ह्यातील तहसिलदार, दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे प्रकल्प संचालक विजय कानेकर, गटविकास अधिकारी यांची दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थिती होती.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






