विकसित महाराष्ट्र-2047 सर्व्हेक्षण परभणीकरांना आपले विचार, संकल्पना मांडण्याची महत्वाची संधी

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी

 

सर्व्हेक्षणात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा – जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे

लिंक, क्युआर कोडच्या माध्यमातून सर्व्हेक्षणात व्हा सहभागी

परभणी राज्य शासनामार्फेत राबविण्यात येत असलेल्या ‘विकसित महाराष्ट्र- 2047 या सर्व्हेक्षणात परभणी जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपले मत, विचार, संकल्पना नोंदवाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज सदर सर्व्हेक्षणाबाबत आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, महानगरपालिका आयुक्त धैर्यशील जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी वि.मा.वाघमारे यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते.

विकसित महाराष्ट्राचे चित्र कसे असेल याचा भविष्यवेध घेणारे ‘विकसित महाराष्ट्र-2047’, असे व्हिजन डॉक्युमेंट महाराष्ट्र शासन तयार करत आहे. हा राज्याच्या शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाचा आराखडा असेल. हा आराखडा तयार करताना सर्वसामान्य लोकांच्या अपेक्षा, आकांक्षा, विचार व समस्या समजुन घेण्यासाठी हे नागरिक सर्व्हेक्षण आयोजीत केले जात आहे. या सर्व्हेक्षणात नागरिकांना ऑनलाईन सहभागी होता येणार आहे. https://wa.link/o93s9m या लिंकच्या माध्यमातून मोबाईलद्वारे एक लहानशी प्रश्नावली भरुन द्यावयाची आहे. टाईप करुन अथवा मोबाईलमध्ये आवाज रेकॉर्ड करुन आपले मत नोंदविण्यात येणार आहे. सर्व्हेक्षणामध्ये 7 सोपे प्रश्न विचारले जातात.

ही मोहीम जिल्ह्याच्या प्रत्येक भागात/क्षेत्रात पोहोचवण्यासाठी विविध गटांमार्फत संपर्क केला जाणार आहे. त्यासाठी सर्व विभागप्रमुख, तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, कृषि सहायक यांनी ग्रामपातळीवर नागरीकांना सर्वेक्षणासाठी प्रोत्साहीत करावे. सर्व शासकीय, निमशासकीय अधिकारी/ कर्मचाऱ्यांचा वैयक्तिक सहभाग नोंदविणे आवश्यक आहे. सर्व कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालये, विद्यार्थी व तरुण वर्ग यांचा सक्रीय सहभाग, सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी वृंद, सर्व सामाजिक संघटना, स्वंयसेवी संघटना, बचतगट, शेतकरी उत्पादक संस्था, सहकारी संस्था, सर्व कृषि उत्पन्न बाजार समित्या, दुध उत्पादक संघ, नगर परिषद मुख्याधिकारी व शहरी प्रशासनाचे सक्रीय सहकार्य, स्थापत्य अभियंते, डॉक्टर्स, डॉक्टर्स असोसिएशन, उद्योजक संघटना, सामाजिक संस्था आदींनी या सर्व्हेक्षणात सहभाग नोंदवावयाचा आहे.

या उपक्रमाचे उद्दिष्ट म्हणजे परभणी जिल्ह्यातील प्रत्येक घटकाचा आवाज शासनापर्यंत पोहोचवणे आणि जिल्हा विकास प्रक्रियेत सर्वांचा सहभाग सुनिश्चित करणे होय. त्यामुळे सर्व नागरिकांनी या सर्व्हेक्षणात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल