स्वराज्य वार्ता प्रतिनिधी किसन बी पावर
माजलगाय चे अध्यक्ष/सचिव बप्पासाहेब रामराव फुलगे व सचिव राहुल रामराव पुलगे, वाईस चेअरमन, व संचालक मंडळाने माझी ठेवी परत करण्यास कपटपूर्व कसूर केल्यामुळे त्यांचे विरुध्य कायदेशीर गुन्हे दाखल करा
माजलगाव येथील असेफाबी गफार बागवान रा. बागवान गल्ली . माजलगाव ता. माजलगाय जि.बीड मी वरील ठिकाणी रहीवाशी असून मी मंजुरी करून माझी व माझ्या कुटुंबाची उपजीवीका भागवत आहे , माझ्या कुटुंबात मी माझे चार मुले असे आमचे एकत्र कुटूंब आहे.
भी मौजे बागवान गल्ली , माजलगाव ता. माजलगाव जि.बीड येथील रहीवाशी असून ज्ञानेश्वरी अर्बन को.ऑप क्रेडीट सोसायटी लि. माजलगाव शाखा माजलगाव या शाखेचे शाखाधिकारी यांची व त्या शाखेतील इतर कर्मचारी यांची व माझी बागवान गल्ली, माजलगाव येथे सतत येणे-जाणे असल्यामुळे माझी व त्यांची ओळख निर्माण झाली तसेच सदरील माजलगांव शाखेचे शाखाधिकारी व इतर कर्मचारी हे माझ्या घरी येवून माझ्या सहित गल्लीतील अन्य लोकांना सदरील त्यांचे संस्थे बद्दल माहिती देत होते व सदरील संस्थेचे अध्यक्ष/सचिव बप्पासाहेब रामराव फुलगे सचिव राहुल रामराव फुलगे व्हाईस चेअरमन, व संचालक मंडळ यांच्या बाचतीत आम्हाला त्यांनी माहिती सांगून तुम्ही जर आमचे संस्थेमध्ये मुदत ठेवी ठेवल्यास सदरील संस्था ठेवीवर जास्तीची व्याजदर देईल असे आमीष आम्हास दिले. आमची त्यांची ओळख निर्माण झाल्यामुळे शाखाधिकारी यांचे सांगणे वरुन ज्ञानेश्वरी अर्बन को.आप क्रेडिट सोसायटी लि. माजलगाय शाखा माजलगाव या शाखेमध्ये आम्ही ठेवी ठेवण्याचे कबूल केले व सदर ठेवीची रक्कम ज्यावेळेस लागेल त्या वेळेस ती तुम्हाला वेळोवेळी परत देण्याचे आश्वासन सदर संस्थेने मला दिले , त्यामुळे मी माझी शिवार मौजे फुले पिंपळगाव येथील गट नं.२७१ मधील ०१ हे.६० आर जमीन विक्री करून व स्वकष्टाने कमविलेले रक्कमेतून सदर संस्थेमध्ये ठेवी ठेपल्या होत्या.
माजलगाव शाखेमध्ये केलेली असून सदरील मुदतीप्रमाणे मुदत संपल्यावर मी माझे वर नमूद ठेवीच्या रक्कम तसेच माझ्या त्या शाखेच्या खात्यामधील असलेल्या रक्कमा मी मार्च २०२४ मध्ये मागण्यासाठी गेले असता, सदरील बँकेचे चेअरमन, मुख्य कार्यकारी अधिकारी, शाखाधिकारी कर्मचारी व संचालक मंडळ यांनी सदर रक्कम परत देतो सध्या संख्येमध्ये रकमेची रक्कम मला ८ ते १०दिवसांनी सदर माजलगाव शाखेमध्ये गेले असता सदरील संस्थेचे शाखाअधिकारी कर्मचारी व संचालक मंडळ यांनी रक्कम देण्या संदर्भात उडवाउडवीची उत्तरे दिले.
रक्कम देतो म्हणून आजपर्यंत सदर मला माझी वर नमुद ठेवीची व खात्यातील रक्कम दिलेली नाही. त्यामुळे सदरील मल्टीस्टेट व्यवस्थापक व कामकाज चालवण्यास जवाबदार असलेले प्रवर्तक चेअरमन. संचालक मंडल व कर्मचारी हे दोषी आहेत सदरील संस्थेचे चेअरमन , व्हाईस चेअरमन व संचालक मंडळ यांचे नियंत्रण असून त्यांच्या कपट पूर्वकारस्थानामुळे माझ्या वरील ठेवीची रक्कम त्यांना मुदत संपल्यानंतर ही मला परत केली नाही. माझी आर्थीक फसवणूक करण्याच्या वाईट उद्देशाने व माझ्याकडून आर्थीक लाभ घेण्याच्या वाईट उद्देशाने माझ्या वरील रक्कम मी अनेक वेळ मागूनही मला अजपर्यंत परत दिल्या नाही. त्यामुळे वरिल लोकांनी माझी फसवणूक केली असून आर्थीक लाभ घेतला आहे मला खोटे डिपॉझीट बॉन्ड देवून माझी फसवणूक केली आहे.
मला माझ्या कुटुंबाच्या घर खर्चासाठी तसेच आर्थिक समस्येला समोर जावे लागत आहे तसेच माझ्या आर्थिक नुकसानीस जवाबदार ज्ञानेश्वरी अर्बन को. ऑप क्रेडीट सोसायटी लि. माजलगाव शाखा माजलगावचे चेअरमन यांना मी माझे आपल्या संस्थेकडे जमा असलेली रक्कम मागणी केली असता मला लक्ष्मी अर्बन को. ऑप बैंक लि .लातूर शाखा माजलगाव प्रत्येकी रक्कम रु.५,००,०००/- रुपयाचे अनुक्रमे धनादेश क्र१ क्रमांक,०२२७६३२.०२२७६२,३. ०२२७६१ मला दि.२१/०६/२०१४, दि.२३/०६/२०१४ दि,२५/०६/२०२४ असे प्रत्येकी पाच लाख रुपयांचे धनादेश दिले व सदर धनादेश मी माझे खाते असलेल्या बँकेत दि,२५/०६/२०२४ रोजी जमा केले असता सदरचे धनादेश खात्यात अपुरी रक्कम असल्यामुळे परत आले. मला तुमचे संस्थे मध्ये डिपॉझिट केलेली रक्कम मिळाली नाही व तुम्हाला तुमचे संचालक मंडल यांना तुमचे खात्यामध्ये अपूरी रक्कम असतांना देखील त्यांनी माझी आर्थीक फसवणूक केलेली आहे. तसेच सदर संस्थेच्या चेअरमन यांनी मला दिनांक ११/०६/२०२४ रोजी माझे खाते असलेल्या एच.डी.एफ सी बैंकचे खाते क्रं ५०१००५७८७२४०९२ च्या खात्यावर रक्कम रु.८,००,०००/- रुपये आर.टी. जी एस करतो असे सांगीतले परंतु सदरच्या दिवशी माझ्या खात्यावर आर.टी.जी.एस केले नाही फक्त पावती दिली व मला पैसे न देता माझी आर्थीक फसवणूक केलेली आहे.
वरील रक्कम मला अद्यापपर्यंत चेअरमन व संचालकाच्या चुकीच्या कार्यपध्दतीमुळे मिळालेल्या नाहीत. त्यामुळे वित्तीय संस्थेमधील चेअरमन, काईस चेअरमन, संचालक मंडळ व व्यवस्थापक यांनी आपसात कपटपूर्व संगणमत करून माझी आर्थीक लाभ घेण्याच्या वाईट उद्देशाने माझी फसवणूक केलेली आहे. त्यामुळे माझ्या या अर्जाचा योग्य तो विचार करून व चौकशी करून संबंधीत माजलगाव शाखेच्या अध्यक्ष/सचिव , शाखाधिकारी, इतर कर्मचारी व सर्व संचालक मंडळ यांच्या विरुद कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी पोलीस अधीक्षक यांनी केली आहे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






