शेतकऱ्यांना पीएम किसान, नमो किसान व राशनचे पैसे तात्काळ द्या : नुमान चाऊस

स्वराज्य वार्ता प्रतिनीधी किसन बी पवार

पालकमंत्री, खासदार व जिल्ह्यातील सर्व आमदारांची चाऊस घेणार भेट

महाराष्ट्रात सध्या खरीप पेरणी सुरू आहे. या काळात शेतकऱ्यांना पैशांची गरज असते. पेरणी झाल्यापासून महिना उलटला तरी आतापर्यंत पाऊस पडलेला नाही म्हणून अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना पुन्हा आर्थिक तरतूद करावी लागत आहे. अगोदरच कर्जबाजारी झालेला शेतकरी पुन्हा ही तरतूद करण्यास असमर्थ आहे. म्हणून शासनाने विविध योजना अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना आर्थिक मदत त्यांच्या खात्यात तात्काळ पाठवावी. शेतकऱ्यांची आत्महत्या व त्यांची आर्थिक परिस्थिती बघता पीकविमा अर्जासाठी ठेवलेले शुल्क हे न परवडणारे आहे. म्हणून पीकविमा एक रुपयात भरण्याची योजना चालू ठेवावी यासह सर्व मागण्या मौलाना आझाद युवा मंचचे बीड जिल्हाध्यक्ष नुमान अली चाऊस यांनी केली आहे. ही परिस्थिती बघता राज्य सरकारने तात्काळ शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी नसता येणाऱ्या काळात मौलाना आझाद युवा मंचच्या वतीने जिल्हाभरात लोकशाही मार्गाने आंदोलने करण्यात येईल.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल