आष्टी : आयोजित शिबिरात रक्तदात्यांना प्रमाणपत्र देताना पदाधिकारी.व श्री विश्वंभर महाराज माळोदे
स्वराज्य वार्ता उपसंपादक उमेश वैद्य
शिबिरात ५२ जणांनी केले रक्तदान
परतूर तालुक्यातील आष्टी येथील श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक बाल संस्कार केंद्राच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गुरुपौर्णिमानिमित्त गुरुवारी (दि.१०) आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ५२ जणांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे यात ४ महिला सेवेकऱ्यांनीही सहभाग घेतला.आष्टी येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमानिमित्त गुरुवारी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. तसेच श्री स्वामी समर्थ ब्लड बैंक जालना यांच्या सौजन्याने भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले ज्यामध्ये ५२ रक्तदात्यांनी रक्तदान सारखे श्रेष्ठ दान केले. या वेळी श्री स्वामी समर्थ ब्लड सेंटरचे प्रकाश भांगे, संकेत सरकटे, बिपीन कुमार मोरे,पूजा कांबळे यांनी रक्त संकलनचे काम केले. या वेळी हभप श्री विश्वंभर महाराज माळोदे यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. तर शिबीर यशस्वी करण्यासाठी श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक व बाल संस्कार केंद्र (दिंडोरी प्रणीत) आष्टी येथील सेवेकऱ्यांनी परिश्रम घेतले.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






