स्वराज्य वार्ता प्रतिनीधी अहमद अन्सारी
परभणी येथे महाराष्ट्र राज्य आरोग्य वर्धिनी योग शिक्षक संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष श्री डॉ.मनोज निलपवार यांच्या सूचने नुसार जिल्हा परिषद च्या प्रांगणात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. संघटनेचे राज्य अध्यक्ष गजानन चौधरी यांच्या हस्ते महर्षी पतंजली यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.श्री वसंत पारवे व श्री सुंदरदास मोरे यांनी उपस्थित योग शिक्षकांना गुरुपौर्णिमेची माहिती व महत्त्व सांगितले. याप्रसंगी श्री अशोक कुंभार, श्री मयांक सोनटक्के, श्री गजानन पवार, श्री भगवान कच्छवे, आरतीताई शिंदे, कु. शरयू यादव, संघरक्षित गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
छायाचित्र ओळी
परभणी येथे महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.याप्रसंगी गजानन चौधरी, वसंत पारवे, सुंदरदास मोरे, अशोक कुंभार,मयांक सोनटक्के, गजानन पवार, भगवान कच्छवे, आरतीताई शिंदे, शरयू यादव, संघरक्षित गायकवाड दिसत आहेत.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






